ashok chavan on ss | Sarkarnama

बदललेल्या राजकीय परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा लागणार - अशोक चव्हाण

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी `बदललेल्या राजकीय परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल' असे एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितले. 

पुणे - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी `बदललेल्या राजकीय परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल' असे एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितले. 

भाजपच्या शिष्टमंडळाने आज दुपारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार बनवण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. त्यानंतर राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. कॉंग्रेसच्या सर्व आमदारांना यापूर्वीच जयपूरला हलवण्यात आले आहे. भाजपच्या सरकार बनवण्याच्या असमर्थततेमुळे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली  सरकार येणार का? त्याला राष्ट्रावादीसह कॉंग्रेस पाठिंबा देणार का ? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

या सर्व पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी सांगितले, की आम्ही सर्व जण जयपूरमध्ये आहोत. बदललेल्या राजकीय परिस्थितीची माहिती पक्षश्रेष्ठींना देण्यात येईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आमची निवडणूकपूर्व आघाडी झाली आहे. त्यामुळे कशा पद्धतीने पुढे जायचे या निर्णय घ्यावा लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख