Ashok Chavan Reaction on Vidhansabha Polls | Sarkarnama

मोदी-मनी-मशिन चालले नाही : अशोक चव्हाण 

संजय मिस्किन
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

काँग्रेसच्या या यशानंतर प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात जल्लोष करण्यात आला. फटाके व ढोलताशांच्या गजरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहे. या निकालावर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. 

मुंबई : राजस्थान, छत्तीसगड व मध्यप्रदेशात काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर राज्य काँग्रेस मधे जल्लोषाचे वातावरण आहे. प्रदेशाध्यक्ष काँग्रेस अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस विजयाचे सर्व श्रेय पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांना दिले. दरम्यान यावेळी बोलताना या पाचही राज्यात भाजपचे मोदी-मनी-मशिन यांचा हा पराभव असून सामान्य जनता, शेतकरी, व्यापारी, महिला व युवा वर्गाने मोदीच्या भुलथापांना नाकारून राहुल गांधीच्या आश्वासक नेतृत्वाला समर्थन दिल्याचे स्पष्ट केले. 

महाराष्ट्रातही याच प्रकारे भाजपचा पराभव होईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. काँग्रेसच्या या यशानंतर प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात जल्लोष करण्यात आला. फटाके व ढोलताशांच्या गजरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहे. या निकालावर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. 

या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण म्हणाले, ''पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये काँग्रेसची आगेकूच होत आहे. हा एक लोकशक्तीचा विजय आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयाविरोधातील कौल जनतेने दिला आहे. सध्या या राज्यांत जे काही सुरु आहे, अशीच परिस्थिती महाराष्ट्रातही पाहिला मिळणार आहे. त्यामुळे फडणवीस सरकार काही महिन्यापुरतेच राहिल, महाराष्ट्रातसह असेच चित्र पहायला मिळेल. 

हेच जनतेचे 'सच्चे दिन' : राधाकृष्ण विखे-पाटील
''या निवडणुकांच्या निकालानंतर हे समोर येत आहे, की आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव संपल्याचे दिसून येत आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात मतदान केल्याने आम्ही विश्वासघात केल्याची भावना जनतेमधून व्यक्त होत आहे," असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख