'इंटरनॅशनला टी डे'च्या दिवशी विरोधकांचा चहापानावर बहिष्कार नको होता : अशोक चव्हाण

विरोधकांच्या आजच्या चहापानाच्या बहिष्काराला"इंटरनॅशनल टी डे' चा संदर्भ देत चव्हाण यांनी विरोधकांनी केलेली चूक आधारेखीत केली आहे. अधिवेशनाच्या पर्वसंध्येला विरोधकांनी चहा पानावर घातलेल्या बहिष्कारावर चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
Ashok Chavan Criticism on BJP Decission to Abstain from Tea Party on the Eve of Assembly Session
Ashok Chavan Criticism on BJP Decission to Abstain from Tea Party on the Eve of Assembly Session

पुणे : हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहा पानावर बहिष्कार घालून विरोधकांनी राज्याच्या प्रश्‍नावर चर्चा करण्याची एक संधी घालवली आहे. या निमित्ताने राज्यातील ज्वलंत प्रश्‍नावर चर्चा करता आली असती. मात्र, विरोधकांनी ही संधी घालवली. आज 'इंटरनॅशनल टी डे' आहे. या दिवशी तरी चहापानावर बहिष्कार नको होता, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

विरोधकांच्या आजच्या चहापानाच्या बहिष्काराला "इंटरनॅशनल टी डे' चा संदर्भ देत चव्हाण यांनी विरोधकांनी केलेली चूक आधारेखीत केली आहे. अधिवेशनाच्या पर्वसंध्येला विरोधकांनी चहा पानावर घातलेल्या बहिष्कारावर चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात अनेक ज्वलंत प्रश्‍न आहेत. राज्यात नवीन सरकार आहे. जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी एकत्र येऊन चर्चा केली तर त्यातून मार्ग निघू शकतो. त्यामुळे अशी चर्चा आज व्हायला हवी होती, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

नागपूर अधिवेशनात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्काराची परंपरा जुनी आहे. जे आता सत्तेत आहेत. त्यापैकी कॉंग्रेस-राष्ट्रवादीनेदेखील यापूर्वी अनेकवेळा चहापानावर बहिष्कार घातला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आज दुपारी नागपूरला पोहोचले. शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे पहिल्यांदाच नागूपरला आले ते थेट अधिवेशनाच्या निमित्ताने.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com