अशोक चव्हाणांनी जेजुरी गडावर खंडोबाला काय मागितले ? 

..
Ashok-Chavan-@-Jejuri
Ashok-Chavan-@-Jejuri

जेजुरी :  माजी मुख्यमंत्री व नवनिर्वाचित आमदार अशोक चव्हाण हे जेजुरीत खंडोबाच्या दर्शनासाठी गडावर आले होते. त्यांच्या समवेत पत्नी सौ . अमिता चव्हाण , नवनिर्वाचित आमदार संजय जगताप, आमदार अमर राजुरकर, माजी मंत्री डी.पी. सावंत उपस्थित होते.अशोक चव्हाणांनी  जेजुरी गडावर खंडोबाला काय मागितले असा प्रश्न अनेकांना पडला . 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बळ मिळू दे, शेतकऱ्यांना दिलासा मिळू दे ,अशी प्रार्थना यावेळी चव्हाण यांनी खंडोबा चरणी केली. माजी मुख्यमंत्री चव्हाण हे नेहमीच कुटुंबासह खंडोबाच्या दर्शनासाठी येत असतात. नुकतीच निवडणूक झाल्यानंतर ते सहकुटुंब जेजुरीत खंडोबाच्या दर्शनासाठी आल्याचे माजी विश्वस्त सुनील आसवलीकर यांनी सांगितले.  

यावेळी चव्हाण यांनी कुलधर्म कुलाचार केले. देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त ऍड. अशोक संकपाळ यांच्या हस्ते त्यांचा देवसंस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त संदीप जगताप, पंकज निकुडे, माजी विश्वस्त सुनील आसवलीकर, नगरसेवक गणेश शिंदे, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीपपोमण उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com