ashok chavan, mumbai | Sarkarnama

"" नारायण राणेंबाबत मी  काहीही बोलणार नाही '' 

संदीप खांडगेपाटील 
मंगळवार, 27 जून 2017

मुंबई : "" नारायण राणेंबाबत मी यापूर्वीही काही बोललो नव्हतो आणि यापुढे काही बोलणार नाही. त्यांच्याबाबत मला आताही काही बोलायचे नाही अशी भूमिका कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. 

एकीकडे कॉंग्रेस पक्षांकडून कर्जमाफीविषयी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे काम आजही सुरुच आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेसचे कोकणातील मातब्बर नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी नुकतेच कोकणातील एका कार्यक्रमात कर्जमाफीबाबत सरकारची प्रशंसा केली होती याकडे पत्रकारांनी चव्हाण यांचे लक्ष वेधले असता त्यांनी राणेंविषयी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. 

कर्जमाफीविषयी कोण काय बोलतो, ते मला माहिती नाही, मात्र प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपण कॉंग्रेसची भूमिका मांडत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 
रा. स्व.संघ, भाजपचे केंद्र व राज्यातील सरकारची भूमिका शेतकरीविरोधीच आहे. त्यांना कर्जमाफीचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागला आहे. निर्णयाबाबत कोणालाही विश्‍वासात न घेता घाईघाईने जो निर्णय घेतला आहे तो निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर घेतला असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. निवडणूका कधीही लागल्या तरी कॉंग्रेस पक्ष निवडणूकांना सामोर जाण्यास तयार असल्याचे चव्हाण यांनी शेवटी सांगितले. 

कर्जमाफी ही दिशाभूल 

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ही कॉंग्रेसची प्रारंभापासून मागणी होती. भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो निर्णय घेतला आहे. त्यामध्ये घोषणा व कर्जमाफी यात तफावत असल्याचे माहितीतून स्पष्ट झाले आहे. सरकारने आकड्यांच्या खेळामध्ये कर्जमाफी सादर करताना राज्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल केली असल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला. 

राज्य सरकार कर्जमाफीच्या घोषणेखाली राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे सांगण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सुरूवातीलाच स्पष्ट केले. यावेळी सचिन सावंत, राजीव वाघमारे, पृथ्वीराज पाटील, संदेश कोंडविलकर उपस्थित होते. 
मंत्रिमंडळाने केलेली कर्जमाफीची घोषणा ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक असल्याचे सांगून चव्हाण म्हणाले की, शिवाजी महाराजाचे नाव कर्जमाफीच्या घोषणेला देत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. दीड लाख कर्जमाफीची मर्यादाच चुकीची असून वनटाईम सेटलमेंट हा सरकारची आपल्या जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न आहे. वन टाईम सेटलमेंटसाठी शेतकरी पैसे आणणार कोठून ? चार वर्षे दुष्काळ असणाऱ्या राज्यात शेतकरी वन टाईम सेटलमेंट कोठून करणार असा प्रश्‍न चव्हाण यांनी सरकारला केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख