भोकर मतदारसंघात अशोक चव्हाण एक लाख मतांनी आघाडीवर 

Ashok Chavan
Ashok Chavan

नांदेड : काँग्रेसचे बलाढ्य नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे भोकर  मतदारसंघ राज्यभरात लक्षवेधी ठरला होता. त्यांच्या विरोधात त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांना भाजपने रिंगणात उभे केले आहे.

वंचित बहुजन आघाडीने नामदेव आईलवाड यांना उमेदवारी दिली होती. मात्र  अशोक चव्हाण व गोरठेकर यांच्यात थेट लढत होईल अशी चर्चा झाली. मतमोजणीनंतर मात्र ही लढाई एकतर्फी झाल्याचे चित्र दिसून आले. आताची चव्हाण यांची आघाडी एक लाखाहून अधिक मतांची झाली असून अजूनही वाढत आहे.


लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी प्रताप पाटील  चिखलीकरांकडून पराभव स्वीकारावा लागल्याने अशोकरावांनी विधानसभा निवडणूकीत सावध पवित्रा घेत नियोजनबद्ध प्रचार केला. सातत्याने मतदारसंघात राहून उर्ध्व पैनगंगा, भाजप सेना सरकारने पाणी पळवणे व इतर स्थानिक प्रश्न व सत्ताधार्यांच्या नांदेडविरोधी भुमिकेवर प्रचाराचा रोख ठेवला. दुसरीकडे गोरठेकर यांच्यामागे खासदार वगळता भाजप व शिवसेनेची फारशी साथ प्रचारात दिसली नाही. अनेक इच्छुकांना डावलून त्यांनी उमेदवारी मिळविल्याने भाजपचे किन्हाळकर, राम चौधरी आदी जुनी मंडळी नाराज दिसली.  


भोकर मतदारसंघ हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. ज्येष्ठ नेेते (कै) शंकरराव चव्हाण यांच्यापासून ते आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. आता या ठिकाणी पुन्हा अशोक चव्हाण यांना  उमेदवारी दिली होती.  वंचित बहुजन आघाडीने नामदेव आईलवाड यांना उमेदवारी दिली होती.


या मतदारसंघातून अशोक चव्हाण यांचे वडील (कै.) शंकरराव चव्हाण यांनी तसेच गोरठेकरांचे वडील (कै.) बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांनीही प्रतिनिधित्व केले आहे. हे दोघेही 1978 च्या निवडणुकीत एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते. आता तब्बल 40 वर्षांनी त्यांचे वारस एकमेकांसमोर उभे ठाकले होते.  त्यात अशोकराव बाजी मारतील असेच स्पष्ट झाले आहे.    

    
नुकत्याच झालेल्या नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी कॉंग्रेसचे अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. त्यामुळे भोकर विधानसभा निवडणुकीत अशोकराव चांगलेच सावध झाले आहेत. सातत्याने मतदारसंघात राहून ते उर्ध्व पैनगंगा, इतर स्थानिक प्रश्न व सत्ताधार्यांच्या नांदेडविरोधी भुमिकेवर आपल्या प्रचाराचा रोख ठेवला होता.


दुसरीकडे गोरठेकर यांच्यामागे खासदार वगळता भाजप व शिवसेनेची फारशी साथ दिसली नाही. अनेक इच्छुकांना डावलून त्यांनी उमेदवारी मिळविल्याने भाजपचे किन्हाळकर, राम चौधरी आदी जुनी मंडळी नाराज झाली होती. वंचित आघाडीने राज्यभरात अगदी छोट्या छोट्या समाजातील लोकांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणचे उमेदवार हे गोल्ला गोल्लेवार या बहुजन समाजातील आहेत. मात्र, त्यांची उपस्थिती या प्रमुख उमेदवारांच्या हजेरीने झाकोळली गेली.


अशोक चव्हाण यांनी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळाली. ते स्वतः वाडी वस्त्या व तांड्यापर्यंत जाऊन पोहोचले. अनेकांची नाराजी दूर केली. गोरठेकरांना मानणारा मतदारही केवळ भोकर तालुक्यात आहे. मात्र या मतदारसंघाचा भाग असलेल्या मुदखेड व अर्धापूर तालुक्यात चव्हाणांचा एकतर्फी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र^होते. मतमोजणीनंतर अशोक चव्हाण यांनी आपला पारंपारिक भोकरचा किल्ला आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवल्याचे दिसून आले.

भोकर मतदारसंघात आत्तापर्यंतचे विजयी उमेदवार
- १९६२ (धर्माबाद मतदारसंघ) ः शंकरराव चव्हाण (कॉंग्रेस)
- १९६७ (भोकर मतदारसंघ) ः शंकरराव चव्हाण (कॉंग्रेस)
- १९७२ (भोकर) ः शंकरराव चव्हाण (कॉंग्रेस)
- १९७८ (भोकर) ः शंकरराव चव्हाण - (अपक्ष - ३४ हजार ८९६ विजयी)  बाबासाहेब देशमुख गोरठेकर (कॉंग्रेस - २३ हजार ६४५ पराभूत)
- १९८० (भोकर) ः बाबासाहेब देशमुख गोरठेकर (कॉंग्रेस)
- १९८५ (भोकर) ः बाबासाहेब देशमुख गोरठेकर (कॉंग्रेस)
- १९९० (भोकर) ः डॉ. माधव किन्हाळकर (कॉंग्रेस)
- १९९५ (भोकर) ः डॉ. माधव किन्हाळकर (कॉंग्रेस) पराभूत बाबासाहेब देशमुख (अपक्ष)
- १९९९ (भोकर) ः बाबासाहेब देशमुख गोरठेकर (अपक्ष विजयी) पराभूत डॉ. किन्हाळकर (राष्ट्रवादी)
- २००४ (भोकर) ः बापूसाहेब देशमुख गोरठेकर (राष्ट्रवादी विजयी) पराभूत डॉ. किन्हाळकर (अपक्ष)
- २००९ (भोकर) ः अशोक चव्हाण (कॉंग्रेस - एक लाख २० हजार ८४९ विजयी) पराभूत डॉ. किन्हाळकर (अपक्ष)
- २०१४ (भोकर) ः अमिता चव्हाण (कॉंग्रेस - एक लाख ७८१ विजयी) पराभूत डॉ. किन्हाळकर (भाजप - ५३ हजार २२४)

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com