ashok chavan ex cm | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवावा - अशोक चव्हाण

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नांदेड : मराठा आरक्षणाच्या विषयावर कॉंग्रेस कुठलीही कुरघोडी करत नसून उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच बोलण्यावर विश्वास कसा ठेवावा? असा प्रश्न कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी (ता. सहा) प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या निवेदनात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राजकीय पक्ष कुरघोडी करत असल्याचे म्हटले होते. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी टिका केली. ते म्हणाले की, भाजपचे नेतेच आरक्षणावर वेगवेगळ्या मत मांडत असल्याने खरं काय समजायचे? असा प्रश्न उपस्थित करत कॉंग्रेस पक्ष हिंसाचाराचे कधीही समर्थन करत नाही. तसेच मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत भाजप काहीच बोलत नसल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. 

मेगा भरती रद्द करण्यावर श्री. चव्हाण म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावर मेगा भरती स्थगित करत असल्याची घोषणा काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देणारच आहात तर मग भरती रद्द करण्याची गरज क़ाय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाला उशीर होत असल्यानेच हल्ले होत असल्याचे सांगून खासदार चव्हाण म्हणाले की, सरकार आरक्षण देण्यास उशीर करत असल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यातूनच हिना गावित यांच्या कारवर हल्ला झाला आहे. हा प्रकार चुकीचा असल्याची प्रतिक्रियाही श्री. चव्हाण यांनी दिली 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख