ashok chavan demond arrest of sambhaji bjide | Sarkarnama

संभाजी भिडेंना कधीपर्यंत संरक्षण देणार ः अशोक चव्हाण 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मुंबई ः पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने नालासोपारा येथे कारवाई करून 20 जिवंत बॉम्ब आणि जवळपास 50 बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करून घातपाताच्या कटाचा पर्दाफाश केला. या प्रकरणी सनातन आणि शिवप्रतिष्ठाणशी संबंधित लोकांना अटक करण्यात आली आहे. सरकारने या कट्टरतावादी संघटनांच्या कारवायांकडे जाणिवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामुळेच राज्यात कट्टरतेची विषवल्ली वाढली, अशी टीका करत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी संभाजी भिडेंना कधीपर्यंत संरक्षण देणार, असा सवाल केला. 

राज्याच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात घातपात घडविण्याचा कट्टरवादी संघटनांचा कट होता हे उघड झाले आहे. सनातन संस्थेसोबतच भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्तेही या कटात सामील आहेत, हे दहशतवादविरोधी पथकाच्या कारवाईने उघड झाले आहे. 

या प्रकरणात सनातनचा साधक वैभव राऊत याच्या सोबतच शिवप्रतिष्ठानचा सुधन्वा गोंधळेकर यालाही अटक केली आहे. शिवप्रतिष्ठानच्या अनेक कार्यकर्त्यांचा समाजविघातक कृत्यामध्ये सहभाग असल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. भिडे हे भीमा कोरेगाव दंगलीचे मुख्य सुत्रधार व अनेक समाजविघातक कृत्ये आणि दंगलीतील आरोपी आहेत. पण सरकार जाणिवपूर्क भिडे यांच्या कृत्यावर पांघरून घालून संरक्षण देत आहे. सरकार भिडेंना कधीपर्यंत संरक्षण देणार आहे, असा सवाल करून राजकीय फायद्याचा विचार न करता सरकारने कट्टरतेची विषवल्ली मुळासकट उखडून टाकावी असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख