त्या चव्हाणांनंतर आता या चव्हाणांनी शिवसेनेला कोंडीत पकडलं...

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला कोंडीत पकडणारे विधान करून सरकारसमोर पेचप्रसंग उभा केला आहे. या आधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेने 2014 मध्येच काॅंग्रेसशी युती करण्याचा प्रस्ताव दिला होता, असे सांगून सेनेसमोर अडचण निर्माण केली होती.
ashok-chavan-and-prithviraj
ashok-chavan-and-prithviraj

पुणे : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला कोंडीत पकडले असून घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिवसेनेने राज्यघटनेच्या उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा त्यांनी दिला.

चव्हाण यांच्या या वक्तव्यावर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आश्चर्य व्यक्त करत त्यांनी असे विधान का केले, याची कल्पना नसल्याचे सांगितले.   अशोक चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार सोनिया गांधी यांचा तीन पक्षांच्या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

“संविधानाच्या चौकटीतच सरकार चाललं पाहिजे. संविधानाच्या चौकटीबाहेर बाहेर जायचं नाही आणि तसं झालं तर सरकारमधून बाहेर पडायचं, अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली होती. याबाबत संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाहीत. घटना हीच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार, अशी भूमिका घेतली. तसं त्यांनी लिहून दिलं असल्यानेच सरकार स्थापन झालं,” अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

अशोक चव्हाण यांनी सांगितलं की, “तीन पक्षांचं हे सरकार चालणार कसं असा प्रश्न विचारला जात होता. तिन्ही पक्षांची विचारसरणी वेगळी आहे. दिल्लीत आम्ही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली असता त्यांनी नकार दिला. रोज भांडणं होतील. हे सरकार चालणार कसं ? असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर आम्ही चिंता करु नका सांगितलं. मी स्वत: मुख्यमंत्री म्हणून दोन पक्षांचं सरकार चालवलं आहे. त्यात अजून एका पक्षाची भर होईल. त्यामुळे चिंता करु नका

याबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले,``संविधानाच्या चौकटीतच सरकार चालते, ते सगळ्यांना बंधनकारक आहे. कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आणि संविधानांची बांधिलकी आहे, तसच काम करु. भाजपकडून देशात संविधानाला धक्का लावण्याचा काम सुरू. अशोक चव्हाण यांनी नेमके काय विधान केले माहीत नाही .आम्ही पाच वर्ष एकत्रित काम करणार. हा मल्टिस्टारर सिनेमा यशस्वी होणार, पाच वर्षे आनंदाने काम करू``

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com