अशोक चव्हाण म्हणजे कॉग्रेसचे कोपऱ्यात पडलेले नेते :  उध्दव ठाकरे

..
Uddhav_
Uddhav_

परभणी :  राज्यात महायुतीचा झंझावात सुरु आहे. अश्या परिस्थितीमध्ये कॉग्रेस पक्ष पूर्णत: लयास गेला आहे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे कॉग्रेसचे कोपऱ्यात पडलेले नेते आहेत अशी  टिका शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी रविवारी   परभणीत केली.

शिवसेना - भाजप महायुतीचे परभणी विधानसभा मतदार संघातील उमेदवार आमदार डॉ.राहूल पाटील यांच्या प्रचार्थ रविवारी उध्दव ठाकरे यांची येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानात सभा झाली.

यावेळी व्यासपिठावर खासदार संजय जाधव,शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर, मराठवाडा संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरीया, आमदार मोहन फड, आमदार डॉ.जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे, माजी आमदार मिराताई रेंगे, भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे, शिल्पा सरपोतदार, महिला आघाडीच्या विधानसभा प्रमुख अंबिका डहाळे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

सध्या सगळीकडे भगवे वातावरण आहे. केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. राज्यात देखील सत्ता कायम राहणार यात काही शंका नाही. विरोध करणारी कॉंग्रेस आज कुठेच शिल्लक राहीली नाही. अशोक चव्हाणासारखे नेते नांदेड मधील एका कोपऱ्यापुरते मर्यादीत राहीले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले .  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com