भाजपतर्फे आता कॉंग्रेसचे आमदार फोडण्यासाठी टास्क फोर्स - चव्हाण

भारतीय जनता पक्षातर्फे कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान भाजपतर्फे ऑपरेशन लोटस मोहिमेअंतर्गत विधिमंडळाच्या फ्लोअरवर भाजपला बहुमत सिद्ध करता यावे म्हणून एक टास्क फोर्स कार्यान्वित करण्यात आल्याचे समजते.
भाजपतर्फे आता कॉंग्रेसचे आमदार फोडण्यासाठी टास्क फोर्स - चव्हाण

मुंबई - भारतीय जनता पक्षातर्फे कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान भाजपतर्फे ऑपरेशन लोटस मोहिमेअंतर्गत विधिमंडळाच्या फ्लोअरवर भाजपला बहुमत सिद्ध करता यावे म्हणून एक टास्क फोर्स कार्यान्वित करण्यात आल्याचे समजते.

अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना असे सांगितले, कॉंग्रेस आमदारांच्या तक्रारी येत आहेत. आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यपालांनी भाजपला 30 तारखेपर्यंत मुदत दिलेली असल्याने भाजपतर्फे आमदार फोडण्याचे आटोकाट प्रयत्न केले जातील. त्यामुळे तातडीने राज्यपालांनी भाजपला आपले बहुमत सिद्ध करण्यास सांगावे अशी आमची मागणी आहे. 

दरम्यान भाजपच्या ऑपरेशन लोटसची जबाबदारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, बबनराव पाचपुते आणि गणेश नाईक या चौघांवर सोपवण्यात आल्याचे समजते.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com