ashok chavan and mim | Sarkarnama

"एमआयएम' पासून दुर राहा - अशोक चव्हाण

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

परभणी : राज्यात 70 टक्के मतांचे विभाजन झाल्याने 30 टक्के मते मिळालेले भाजपा - शिवसेना सत्तेत बसले. हे विभाजन टाळण्यासाठी एमआयएम व मनसे सोडून अन्य पक्षांना सोबत घेत भाजपा-शिवसेनेला सत्तेतून बाहेर फेकायचे आहे असे सांगत एमआयएमपासून दुर राहण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केले. 

कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोमवारी (ता.29) परभणीत पोचल्यानंतर ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा झाली. यावेळी खासदार चव्हाण बोलत होते. 
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, राज्यात एवढा गंभीर दुष्काळ पडलेला असताना सरकारला याची चिंता नाही. मंत्री पंकजा मुंडे अमेरिकेत आहेत, संभाजी निलंगेकर रात्री अंधारात दुष्काळाची पाहणी करत आहेत. हे सर्व शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत असा आरोप त्यांनी केला. 

जायकवाडीत पाणी देण्यास विरोध करुन राजकारण केले जात आहे. यात शासनाची देखील भूमिका आहे. दुष्काळ सदृष्य आणि पालकमंत्री अदृष्य अशी स्थिती परभणीची झाल्याचे सांगत त्यांनी पालकमंत्र्यावर टिका केली. शिवसेना व भाजपा एकच आहेत. आतून किर्तन आणि बाहेरुन तमाशा या दोन्ही पक्षांची गत झाली आहे. सत्तेचा मलिदा खाण्यासाठी रात्री एक व्हायचे आणि दिवसा भांडणे करायची, हा प्रकार जनतेला आता समजु लागला आहे. एमआयएमला आणि मनसे सोडून अन्य पक्षांना एकत्र करत सत्ता ताब्यात घेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार राजीव सातव यांची उपस्थिती होती 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख