ashok chavan and indira gandhi | Sarkarnama

इंदिरा गांधी यांच्याबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही - अशोक चव्हाण

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

औरंगाबाद : देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्याबद्दल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी चुकीचे विधान केले आहे. इंदिरा गांधी यांचे देशप्रेम सर्वश्रुत आहे, आणि म्हणून त्यांच्याबद्दल कुणी चुकीचे विधान करत असले तर आम्हाला कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा कॉंग्रेसचे नेते सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिन्याचा मुलाखतीमध्ये इंदिरा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर देशपातळीवर त्यांच्या या विधानाचा निषेध होत आहे. कॉंग्रसेचे नेते व महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील राऊत यांच्या विधानावर आपली भूमिका स्पष्ट करत नाराजी दर्शवली आहे. 
अशोक चव्हाण यांनी आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून राऊत यांच्या विधानाचे खंडण केले आहे. चव्हाण म्हणाले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी शंका घ्यायला देखील वाव नाही. एक कर्तबगार नेत्या म्हणून संपूर्ण जगामध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर आहे. त्यामुळे अशी चुकीची विधाने करणे योग्य नाही. 

कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी चालेल, पण त्यांच्याबद्दल आम्ही अपशब्द खपवून घेणार नाही. महापुरूषांबद्दल, देशाच्या माजी पंतप्रधानांबद्दल विधाने करताना आघाडीतील सर्व सहकाऱ्यांनी तारतम्य बाळगले पाहिजे, अशी माझी अपेक्षा असल्याचेही त्यांनी आपल्या पेजवर म्हटले आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख