तुमचे जुने अच्छे दिन आणण्याची जबाबदारी माझी - अशोक चव्हाण

तुमचे जुने अच्छे दिन आणण्याची जबाबदारी माझी - अशोक चव्हाण

औरंगाबाद : अच्छे दिनच्या नावाखाली साडेचार वर्षापूर्वी या सरकारने काय काय आश्‍वासन दिली होती, हे जरा जुन्या व्हिडीओ क्‍लीप काढून पहा. "भाईयो और बहेनो, पेट्रोल के दाम कम हुये के नही' या त्यांच्या भूलथापांचा आता वीट आला आहे. नको तुमचे अच्छे दिन, लौटा दो हमारे पुराने दिन अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 
तुमचे जुने अच्छे दिन तुम्हाला परत मिळवून देण्याची जबाबदारी मी आणि माझे सहकारी घेत आहोत असा शब्द कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दौलताबाद येथील जनसंघर्ष सभेत बोलतांना दिला. 

अब दिल्ली दूर नही, एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. तेव्हा योग्य निर्णय घ्या आणि या सरकारला खाली खेचा असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केले. 
कॉंग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील तहसील कार्यालयावर मोर्चे काढण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर अशोक चव्हाण यांच्या जाहीर सभेचे आयोजन दौलताबाद आणि सायंकाळी औरंगाबाद शहरात करण्यात आले आहे. दुपारी चार वाजता दौलताबाद येथील सभेत अशोक चव्हाण यांनी राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारवर कडाडून हल्ला चढवला. 

अशोक चव्हाण म्हणाले, जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही राज्यातील 121 मतदारसंघात सरकारच्या विरोधात रान पेटवले आहे. आता एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सगळ्यांनी एकजूट दाखवून हे खोटं बोलणार सरकार घालवायचे आहे, सही फैसला लो. देशाच्या अर्थमंत्र्याला सरकार कसे चालवायचे हे कळत नाही, म्हणून तुमच्या खिशातून पैसा काढण्याचे काम सुरू आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले तर म्हणे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर वाढले. पण हे खरे नाही, टॅक्‍सच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचे काम या सरकारने केले. आम्ही या विरोधात आवाज उठवला, मोर्चे काढले तेव्हा कुठे 90 रुपयांवर गेलेले पेट्रोल 75-80 रुपयांवर आल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला. 

इकडे दुष्काळ आणि मुख्यमंत्री क्रिकेटमध्ये दंग 
राज्यात दुष्काळ पडला आहे, लोकांना प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही आणि आमचे मुख्यमंत्री क्रिकेट खेळतायंत. जोरदार भाषण ठोकतायेत, काय तर म्हणे आम्ही बॉल फेकू तर तुम्ही आऊट होणार, आम्ही बॅटमिंटन खेळू आणि तुम्हाला पराभूत करू. हे काय भाषण आहे ? यांना सत्तेवरून खाली खेचण्याची वेळ आता आली आहे. तुमचे जुने अच्छे दिन पुन्हा मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतो याचा पुनरुच्चार देखील अशोक चव्हाण यांनी यावेळी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com