अशोक चव्हाण, अजित पवारांना भेटायचंय तर गाठा रवि भवन

रविभवन येथील एक कॉटेज पक्ष कार्यालयाकरता देण्याची मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे. यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबावही आणण्यात येत असल्याची माहिती आहे. बैठकीत याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नसल्याचे समजते.
Chavan-Pawar-to-stay-at-Ravi-bhavan
Chavan-Pawar-to-stay-at-Ravi-bhavan

नागपूर  : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घ्यायचा विचार असले आणि तुम्ही आमदार निवासात जात असेल तर जावू नका. ते तिथे मिळणार नाहीत. त्यांना रविभवन येथील कॉटेज देण्यात आले आहे.


अशोक चव्हाण हे रविभवनतील कॉटेज क्रमंक 25 तर अजित पवार हे कॉटेज क्रमांक 8 मंजूर करण्यात आले आहे.हिवाळी अधिवेशनसाठी प्रशासन पूर्णपणे तयार आहे. मंत्री आणि आमदारांना राहण्यासाठी निवासव्यवस्था निश्‍चित करण्यात आली आहे. 


मंत्र्यांसाठी रविभवनातील कॉटेज वितरित झाले असून आमदारांची राहण्यासाठी व्यवस्था आमदार निवासात करण्यात आली आहे. सध्या माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री राहिलेल्या अनेकांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात त्यांचा समावेश नसल्याने त्यांच्या राहण्याची व्यवस्था आमदार निवासात करण्यात आली. 


राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात केवळ सहा मंत्र्यांचा समावेश असल्याने रविभवनातील अनेक कॉटेज रिकामे पडले आहे. अशा परिस्थितीत हे कॉटेज मिळावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी उमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.

यावर रविवारी विधिमंडळातील समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यात दोन्ही नेत्यांची मागणी मान्य करीत त्यांना रविभवनातील कॉटेज वितिरत करण्यात आले. मंत्र्यांसाठी राखीव असलेले हे कॉटेज या दोन्ही आमदारांना देण्यात आले असले तरी त्यांना सुविधा आमदरांच्याच राहणार असल्याचे सांगण्यात येते.



 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com