ashok chavan | Sarkarnama

या सरकारपेक्षा निजामशाही बरी - अशोक चव्हाण

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 एप्रिल 2017

औसा, ता. 2 ः कर्जाच्या ओझ्याखाली दबून राज्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, कर्जमाफीसाठी आम्ही विधानसभेत आवाज उठवला तर सरकारने विरोधी पक्षाच्या 19 आमदारांना निलंबित करत मुस्कटदाबी केली. निवडणुकीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा म्हणणारे, आता खुर्चीत बसल्यावर कर्जमाफी शक्‍य नसल्याची भाषा करतात. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्याला बाहेर काढले जाते. मग अशा जुलमी सरकारपेक्षा निजामशाही बरी होती अशा शब्दात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर टीका केली. लातूर जिल्ह्यातून निघालेल्या संघर्ष यात्रेत औसा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. 

रविवार ( ता. 2) संघर्ष यात्रेचे आगमन औशात झाले. यावेळी तालुक्‍यातील बुधोडा, औसा, बोरफळ, आशीव गावातील लोकांशी संवाद साधत गारपिटीत नुकसान झालेल्या येल्लोरी गावाला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भेट देऊन गुंडाप्पा निटुरे या शेतकऱ्याला एक लाख रुपयांची मदत दिली. यावेळी बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आम्हाला कितीही वेळा विधानसभेतून बाहेर काढले तरी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहू आणि या झोपेच सोंग घेतलेल्या सरकारला जाग करू. 
मशीनमध्ये घोटाळे करुन सत्तेवर आले 
केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे ईव्हीएम मशिनमध्ये गडबड करुन सत्तेवर आल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी यावेळी केला. लातूर जिल्ह्यात जेव्हा भूकंप आला तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व विलासराव देशमुख जनतेच्या पाठीशी खंबीपणे उभे राहिले. जागतिक पातळीवरून मदतीचा ओघ आणला आणि भूकंपग्रस्तांना दिलासा दिल्याची आठवण देखील चव्हाण यांनी उपस्थितांना करुन दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख