Ashish Shelar, Tilekar may get cabinet Birth | Sarkarnama

आशिष शेलार, योगेश टिळेकर मंत्री होण्याची चर्चा

सुचिता रहाटे
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

लवकरच होऊ घातलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार आणि हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

मुंबई - लवकरच होऊ घातलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार आणि हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगर पालिका निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच भाजप स्वतंत्रपणे उतरला होता. शिवसेनेसोबतची गेल्या २५ वर्षांची युती तोडत निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या भाजपकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मुंबई भाजप अध्यक्ष नात्याने या निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलार यांच्या खांद्यावर होती. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकांमध्ये भाजपला आजवरची सर्वोत्तम कामगिरी करता आली. भाजपने महानगर पालिका निवडणुकांमध्ये 84 जागा जिंकत बाजी मारली. मुख्यमंत्र्यांनी या विजयाचे श्रेय आशिष शेलार यांना देऊन त्यांच्यावर कौतुकाची थाप मारली.

या यशानंतर आशिष शेलारांची वर्णी मंत्री मंडळात लागावी यासाठी पक्षातील अनेक जण आग्रही होते परंतु आपल्याला पक्षाचा अजून प्रसार करायचा आहे असे म्हटले असले तरी मंत्रीपदाची त्यांची इच्छा लपून राहिलेली नाही. मुंबईतील यशामुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व पतंप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा शेलार यांच्यावर खुष आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख