शेलारांची शिवसेनेसाठी कविता : `छे..छे.. झुकली रे झुकली....'

भाजपचे नेते अॅड. आशिष शेलार यांनी आज सकाळी शिवसेनेला आणि खासदार संजय राऊत यांच्या लेखणीला डिवचत चक्क मुक्त छंदातील कविताच सादर केली आहे.
संजय राऊत आणि अॅड. आशिष शेलार
संजय राऊत आणि अॅड. आशिष शेलार

पुणे - कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलेच वाक् युद्ध रंगले आहे. भाजपचे नेते अॅड. आशिष शेलार यांनी आज सकाळी शिवसेनेला आणि खासदार संजय राऊत यांच्या लेखणीला डिवचत चक्क मुक्त छंदातील कविताच सादर केली आहे.

अॅड. आशिष शेलार यांनी केलेली कविता जशीच्या तशी : 

नाही धार "सच्चाई"कारांच्या शब्दांना आज दिसली
"रोखठोक" लेखणी त्यांच्याकडेच पाहुन म्हणे हसली
सत्ता पहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली
नागू सयाजी वाडीतून का नाही महाराष्ट्र धर्माची उजळणी झाली?
छे..छे..झुकली रे झुकली
मराठी बाणा सांगणारी सेना
सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने घेतलेल्या मवाळ भूमिकेवर काल टीका केली होती. फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांनीही सडकून टीका केली होती. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप असे वाक् युद्ध रंगले आहे. शेलार यांनी थेट राऊत यांच्या लेखणीवरच आज प्रहार करीत शिवसेनेच्या भूमिकेवर कविता ट्विट करीत टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com