`मोदी आणि अमित शहा समजायला संजय राऊतांना 25 जन्म घ्यावे लागतील`

`मोदी आणि अमित शहा समजायला संजय राऊतांना 25 जन्म घ्यावे लागतील`

संजय राऊतंना शुभेच्छा देताना टोमणा!

मुंबई : वय वाढते तशी परिपक्वता वाढावी, अशा टोमणा मारत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मोदी आणि शहा हे समजायला त्यांना अनेक जन्म घ्यावे लागतील, असा तिखट हल्लाही त्यांनी चढविला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या निमित्ताने शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना हा प्रतिहल्ला चढविला. पुढील 25 वर्षे मुख्यमंत्री शिवसेनेचाच, असा दावा राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर शेलार यांना विचारले असता शेलार यांनी राऊतांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. वय वाढते तशी परिपक्वता वाढते, असा लोकांचा समज राऊत यांनी टिकवून धरावा, असे शेलार यांनी सुनावले.

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात गैरसमज पसरविण्यात येत असल्याची टीका राऊत यांनी अमित शहा यांच्याकडे रोख ठेवून केली होती. त्यावर बोलताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल राऊत यांनी जपून बोलावे. तसेच या दोन नेत्यांची मने समजण्यासाठी अनेक जन्म राऊतांना घ्यावे लागतील, असे शेलारांनी ऐकविले. तसेच मोदी आणि ठाकरे यांच्यात कोण विसंवाद निर्माण करत आहे, हे जनता रोज टिव्ही माध्यमांतून पाहत आहे. एक वगनाट्य राऊत करत असल्याची टीका त्यांनी केली.

आधी मातोश्रीवर इतर नेते जात होते. आता विविध हाॅटेलमध्ये ट्रीप नेण्याची वेळ `मातोश्री` मधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. `मातोश्री`वरून राज ठाकरेंना भेटायलाही कोणी जात नव्हते. मात्र सत्ता लालसेपोटी उद्धव ठाकरेंना काॅंग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांना भेटण्यासाठी जावे लागत आहे, अशी टीका त्यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com