संघर्षासाठी तयार रहा : आशिष शेलार  

..
Ashish_Shelar
Ashish_Shelar

मुंबई  : येणार काळ हा संघर्षाचा काळ आहे. त्यामुळे त्यासाठी तयार रहा.सत्तेमुळे शिवसेनेला गाड्या मिळाल्या पण त्यांनी सामान्य माणसांचा विश्वास गमावला आहे, शेतकऱ्यांचा सन्मान करायला हे लोक विसरले आहेत. त्यामुळे आता गंगा उलट वाहत आहे. संघर्षासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहा अशी साद भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी घातली आहे.

सांताक्रुझ पूर्व येथे मराठा कॉलनी  भाजप कोकण जागृती संघटनेच्या वतीने महेश पारकर यांनी निर्धार सभेचे नुकतेच आयोजन केले होते. त्यावेळी भाजपचे आमदार आशिष शेलार, पराग अळवणी आणि नितेश राणे यांचा सत्कारही करण्यात आला. त्यावेळी उपस्थित भाजपच्या आमदारांनी महाविकास आघाडीवर जोरदार घणाघात केला. 

श्री. शेलार पुढे म्हणाले, ''सत्तेत नसतानाही, आमचा जनता सत्कार करत आहे.  पण वांद्रे पूर्व मतदारसंघातून मुख्यमंत्री उ्दधव ठाकरे यांच्यासह एकूण तीन मंत्री याच मतदारसंघातून असूनही त्यांचा जनता सत्कार करत नाही याचे चिंतन यांनी केले पाहिजे.  विधानसभा निवडणूकीच्या काळात शिवसेना आणि भाजप हिंदुत्वाचा मसुदा घेऊन लढली. "


" आधी राम मंदिर आणि मगच सरकार स्थापन करणार अशी घोषणा करणारे उद्धव ठाकरे यांनी प्रचारादरम्यान, २४ तारखेला अयोध्येत येणार असल्याचे जाहिरही केले होते परंतु सत्तास्थापनेच्या लालसेपोटी त्यांनी हाताचा पंजा आणि बंद पडलेल्या घड्याळाला सोबत घेतले त्यामुळे आता लोकांच्या मनात या लोकांप्रती आदर राहिलेला नाही. सत्ता कमवली असली तरी संवेदना गमावली,  अशा शब्दांत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. 


मातोश्रीच्या दारात मदत मागायला आलेल्या शेतकरी आणि त्याच्या आठ वर्षाच्या मुलीला पोलिस व्हॅन मंध्ये डांबून ठेवणारे हे पापी सरकार आहे त्यामुळे भविष्यात मातोश्रीच्या दारात येणाऱ्या प्रत्येकाला तेथे राहणारे मदत करो अथवा न करो पण तुम्ही मदत करा असे आवाहनही त्यांनी केले. 


स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान व बदनामी करणाऱ्या काँग्रेसच्या पुस्तिकेवर महाराष्ट्रात बंदी घाला, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 
.

महाराष्ट्रात ही पुस्तिका वितरित होऊ नये यासाठी त्यावर तातडीने महाराष्ट्र सरकारने बंदी आणावी. तसा प्रयत्न करणाऱ्यांंवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com