आशीष देशमुखांचा नागपूर लोकसभा मतदारसंघावर उमेदवारीचा दावा 

माजी आमदार आशीष देशमुख यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघावर कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे दावा केला आहे. आशीष देशमुख यांनी नागपूर शहर कॉंग्रेस समितीकडे अर्ज सादर करून कॉंग्रेसने उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
आशीष देशमुखांचा नागपूर लोकसभा मतदारसंघावर उमेदवारीचा दावा 

नागपूर : माजी आमदार आशीष देशमुख यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघावर कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे दावा केला आहे. आशीष देशमुख यांनी नागपूर शहर कॉंग्रेस समितीकडे अर्ज सादर करून कॉंग्रेसने उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
 
आशीष देशमुख यांनी गेल्या 2 ऑक्‍टोबरला वर्धा येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आशीष देशमुख 2014 मध्ये भाजपचे आमदार म्हणून काटोल मतदारसंघातून निवडून आले होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे ते सुपुत्र असून भाजपचे आमदार असताना राज्य सरकारच्या धोरणावर त्यांनी सडकून टीका केल्याने चर्चेत आले होते.

स्वतंत्र विदर्भ, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरून आशीष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सात पानाचे पत्र पाठविले होते. या पत्राला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही. तसेच रेशीमबागमध्ये भाजपच्या आमदारांसाठी आयोजित केलेल्या अभ्यास वर्गालाही ते उपस्थित न राहिल्याने भाजपने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या वादानंतर महात्मा गांधी यांच्या 150 जयंतीनिमित्त गेल्या 2 ऑक्‍टोबरला कॉंग्रेसच्या अ. भा. कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक वर्धा येथे पार पडली. 

यावेळी झालेल्या जाहीर सभेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे आशीष देशमुख यांनी स्वागत केले होते. यानंतर त्यांनी लगेच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा 6 ऑक्‍टोबरला मंजूर झाला आहे. तेव्हापासून त्यांनी नागपूर, वर्धा व अकोला या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी चाचपणी केली. 

प्रदेश कॉंग्रेस समितीच्या निर्देशानुसार नागपूर शहर कॉंग्रेस समितीने लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागितले आहे. आशीष देशमुख यांनी अर्ज घेऊन नागपूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. आशीष देशमुख यांनी अर्ज दाखल केल्याच्या वृत्ताला नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दुजोरा दिला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com