जुमलेबाज भाजपला पराभूत करा : डॉ. आशीष देशमुख

जुमलेबाज भाजपला पराभूत करा : डॉ. आशीष देशमुख

नागपूर :  भाजप सरकारने पाच वर्षे आश्‍वासने देण्याशिवाय काहीच केले नाही. त्यामुळे जुमलेबाजांना पराभूत करा, असे आवाहन दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांनी केले. 


महागाईला कारण ठरणारी धोरणे आखणाऱ्या, बेरोजगारांना वाऱ्यावर सोडणाऱ्या, उद्योगधंद्यांना बरबाद  करणाऱ्या, गुन्हेगारीवर वचक न बसविणाऱ्या, नागपूरचा विकास न करणाऱ्या आणि मस्तवालपणे मतदारांना गृहित धरून युतीचे सरकार राज्याचा गाडा हाकत आहे. भाजप-संघाची देशविरोधी, बहुजनविरोधी, लोककल्याणविरोधी विचारधारा पराभूत करण्याचे ध्येय आहे. सामान्यांना भ्रमित करून सत्ता हस्तगत करणाऱ्या भाजप नावाच्या प्रवृत्तीला हरवण्याचे आणि मोजक्‍या लोकांना श्रीमंत करून बहुजन समाजाला महागाईच्या आगीत भाजून काढू पाहणाऱ्या दृष्ट लोकांच्या प्रतिनिधीला हरवण्याचे ध्येय आहे, असेही आशीष देशमुख म्हणाले. 


मिहान, सेझ, एमआयडीसी, मोठ्या कंपन्या, उद्योगांमध्ये मोठ्या गुंतवणुकी, मोठा रोजगार अशा आश्‍वासनांची खैरात वाटून भाजपने सत्ता बळकाविली. खोटी आश्‍वासने दिल्यामुळे नागपूरच्या अधोगतीला सुरुवात झाली. नागपूरकरांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. भाजपने विकासापेक्षा जुमलेबाजी जास्त केली. सबका साथ, सबका विकास म्हणत सगळ्यांचे घास हिरावून घेतले आहे. बेरोजगारी, महागाई, महिला असुरक्षितता अशा अनेक प्रश्‍नांनी नागपूरकर हैराण झाले आहेत. बेरोजगारी ही प्रत्येक घरातील गंभीर समस्या आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन करा, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी जनतेला केले. 


नरेंद्रनगर येथे डॉ. आशीष देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. येथून प्रारंभ झालेल्या भव्य बाईक रॅलीच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क साधला. त्यांच्यासोबत राकेश पन्नासे, सदन यादव, सागर लोखंडे, माहुरे, आशीष बालपांडे, गौतम गाणार, इतर वरिष्ठ नेते तसेच हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com