अंगणवाडी सेविकांचे प्रश्न संसदेत मांडणार : सुप्रिया सुळे 

अंगणवाडी सेविकांचे प्रश्न संसदेत मांडणार : सुप्रिया सुळे 

केडगाव : अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्या या देशातील कर्तृत्वान महिला असून त्यांना पहिले सक्षम केले पाहिजे. देशाची सशक्त पिढी घडविण्याचे काम त्या करतात. त्यामुळे त्यांचे प्रश्न मी संसदेत मांडणार आहे, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

 
दौंड पंचायत समितीच्यावतीने तालुक्‍यातील आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका पुरस्कारांचे वितरण खासदार सुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके, दौंड पंचायत समितीचे सभापती झुंबर गायकवाड आदी उपस्थित होते. अंगणवाडीच्या सर्व पर्यवेक्षिकांना येत्या 15 दिवसांत टॅब दिला जाईल, असे राणी शेळके यांनी यावेळी जाहीर केले. 

महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याबाबत चिंता व्यक्त करताना सुळे यांनी उपस्थित असलेल्या किती महिलांनी हिमोग्लोबीन तपासले आहे असे म्हटल्यावर केवळ 10 ते 12 हात वर आले. यावर सुळे म्हणाल्या, "पुणे जिल्ह्यातील संपूर्ण अंगणवाडी सेविका व आशा कर्यकर्तींचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हेल्थ कार्ड तयार केले पाहिजे. या सर्व महिलांचे स्तन व गर्भाशयाची कर्करोग तपासणी झाली पाहिजे. दौंडमध्ये 109 मुले कुपोषित आहे. त्यातील एकही मुल कुपोषित राहणार नाही. याची खबरदारी आपण सर्वजण घेऊ. आशा कार्यकर्तींना सायकल देण्याचा विचार आहे.'' 


यावेळी अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीस स्वतंत्र इमारत द्या, पगार, सादिल व साडी अनुदान वाढवा, कागदपत्रांची कामे कमी करा, अंगणवाडीला वीज व वजनकाटे द्या, पुरस्कारात पारदर्शता असावी आदी मागण्या केल्या. माजी आमदार रमेश थोरात, राणी शेळके, झुंबर गायकवाड व सयाजी ताकवणे यांची यावेळी भाषणे झाली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com