शिवसेनेने हकालपट्टी केल्याचा बदला आशा बुचकेंनी घेतलाच... सेनेचा आमदार पाडला...

शिवसेनेने हकालपट्टी केल्याचा बदला आशा बुचकेंनी घेतलाच... सेनेचा आमदार पाडला...

नारायणगाव : जुन्नर विधानसभा मतदारसंघात झालेल्या तिरंगी चुरशीच्या  लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल वल्लभशेठ बेनके ७४ हजार ९५८ मते मिळवून विजयी झाले. बेनके यांनी शिवसेनेचे  उमेदवार, विद्यमान आमदार शरद  सोनवणे यांचा ९ हजार६८ मतांनी पराभव केला.

बेनके यांच्या विजयांमुळे जुन्नर तालुक्यात प्रथमच माजी आमदाराच्या मुलाला आमदार होण्याची संधी मिळाली आहे. सोनवणे यांच्या पराभवामुळे निवडून आल्या नंतर सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याची जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मागील सहा निवडणूकीतील परंपरा या वेळी खंडीत झाली आहे. बेनके यांच्या या ऐतिहसिक विजयामुळे मागील पाच वर्षांपासुन सत्तेपासून दूर असलेल्या तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नवंचैतन्य निर्माण झाले आहे.

जुन्नर विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार २ लाख९९ हजार ६४८ होते.या पैकी १ लाख ४५ हजार ८७८ महिला मतदार होते.२१ ऑक्टोबर रोजी मतदान झाले.दोन लाख १ हजार ७६४ (६७.३३ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र अंतिम लढत राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार बेनके,शिवसेनेचे विद्यमान आमदार शरद  सोनवणे, अपक्ष उमेदवार अशा बुचके यांच्यात झाली. लेण्याद्री देवस्थानच्या यात्रा निवास सभागृहात आज सकाळी आठ मतमोजणी सुरू झाली.

मतमोजणी साठी चौदा टेबल लावण्यात आले होते. मतमोजणीच्या एकूण सव्वीस फेऱ्या झाल्या. निवडणुक निर्णय अधिकारी सारंग कोडलकर यांनी सायंकाळी सहा  वाजता अंतिम निकाल जाहीर केला. सर्वाधिक ७४ हजार ९५८ मते मिळाल्याने  निवडणुक निर्णय अधिकारी कोडलकर यांनी बेनके यांना विजयी घोषित केले.उमेदवारांना मिळालेली मते: अतुल बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस,विजयी):  ७४ हजार ९५८ आमदार शरद सोनवणे:६५ हजार ८९०(शिवसेना),आशा बुचके(अपक्ष): ५० हजार ४७ .

मतविभागणीमुळे सोनवणे पराभूत: शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून बुचके यांची ओळख होती.मागील सलग दोन निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तिसऱ्यांदा त्या शिवसेनेकडून इच्छुक होत्या.लोकसभा निवडणुकी पूर्वी आमदार सोनवणे यांनीं मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला.लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेवून बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. या मुळे तालुक्यात जेष्ठ शिवसैनिक व नवंसैनिक असा वाद निर्माण झाला. ज्येष्ठ शिवसैनिकानी प्रत्यक्ष प्रचारात भाग घेऊन बुचके यांना मदत केली.शिवसेनेतील मतविभागणीचा फटका बसल्याने सोनवणे पराभूत झाले असल्याचे मतमोजणी नंतर स्पष्ट झाले आहे.

बुचके यांची पराभवाची ह्या हँट्रिक: सन २००९ व सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे वल्लभशेठ बेनके व सोनवणे यांच्याकडून बुचके पराभूत झाल्या होत्या.या वेळी मी आमदार होणारच या ईर्षेने त्यांनी प्रचार केला होता. मात्र तिसऱ्यांदा पराभव झाल्या मुळे त्यांचे आमदारकीची स्वप्न पूर्ण झाले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com