`शिवाजीराव आढळरावांनी माझा दोन निवडणुकांत घात केला`

`शिवाजीराव आढळरावांनी माझा दोन निवडणुकांत घात केला`

नारायणगाव : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आम्ही देव मानले. मात्र त्यांना देवपण जपता आले नाही, त्यात आमचा काय दोष? आढळरावांनी माझा दोन निवडणुकीत घात केला,असा आरोप जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत गद्दारी केली असल्याचा आरोप करणाऱ्या माजी खासदारांनी विघ्नहर व भीमाशंकर देवस्थानला साक्ष ठेवून केवळ एक पुरावा द्यावा, तुमचे जर खरे निघाले तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे आवाहन बुचके यांनी दिले.

खोडद (ता. जुन्नर) येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटनप्रसंगी झालेल्या सभेत
बुचके बोलत होत्या. या वेळी विघ्नहरचे संचालक संतोष खैरे, माजी संचालक कुंडलिक गायकवाड, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, माजी संचालक कुंडलिक गायकवाड आदी मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आळेफाटा येथे झालेल्या मेळाव्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बुचके यांच्यावर गद्दारी केल्याचा आरोप केला होता. या आरोपाचा बुचके यांनी येथील सभेत समाचार घेतला.

बुचके म्हणाल्या, ""तीन महिन्यांपूर्वी ज्यांना तुम्ही शिवसेना पक्षात घेणार नसल्याचे सांगत होता. त्यांनाच तुम्ही पक्षात घेतले. पुणे-नाशिक महामार्गावर अपघात होत असताना पंधरा वर्षांत तुम्हाला साधे हॉस्पिटल उभारता आले नाही. तुमच्यासाठी मी अनेक गुन्हे माझ्या अंगावर घेतले. माझा कोणताही दोष नसताना शिवसेना पक्षातून केलेली हकालपट्टी माझ्या जिव्हारी लागली आहे. खोडद येथील गावतळ्याच्या कामाची मंजुरी मी आणली असताना, तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी व तुम्ही गावतळ्याचे उद्‌घाटन करता. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचे उद्योग थांबवा.

गद्दारी केल्यामुळेच माझा दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. मात्र मी कोणाला दोष दिला नाही. तुमचा पराभव तुमच्या कर्मामुळे झाला आहे., असा आरोप त्यांनी केला.

 तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधींचा समाचार घेताना बुचके म्हणाल्या, ""मी कोणत्याही अधिकाऱ्याला मारहाण न करता कामे करून घेत आहे. केवळ दशक्रिया, बारसे, लग्न समारंभ करून दहशत निर्माण करून तालुक्‍याचा विकास होणार नाही. मागील अठरा वर्षांत मी दळणवळण, आरोग्य, शिक्षण या संदर्भातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. तालुक्‍यातील सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी असल्यामुळे मी आमदार होणारच.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com