asauddin owaissy on ayodhya verdict | Sarkarnama

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम, मात्र अचूक नाही : ओवेसी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

संघ परिवार काशी मथुराचा वाद यापुढील काळात वाढवेल, असेही ओवेसी म्हणाले.  

पुणे: राम मंदिर- बाबरी मशिदीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अंतिम आहे पण अचूक नाही, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदद्दीन ओवेसी यांनी दिली आहे. 

निकालानंतर हैद्राबादमध्ये पत्रकारांशी बोलताना ओवेसी म्हणाले, भारतीय संविधानावर मुसलमानांचा पुर्ण भरोसा आहे. आमचा कायदेशीर हक्कासाठी लढा होता, पाच एकर जमिनीसाठी नव्हता. मुस्लीम लॉ बोर्ड हा तोडगा मान्य करेल का, हे मला माहिती नाही. मात्र पाच एकरचा तोडगा मान्य करू नये असे माझे मत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम आहे पण अचूक नाही. असे विधान न्यायमुर्ती जे एस वर्मा यांनी यापुर्वी केले आहे, जे संघ परिवाराला प्रिय आहेत. देश हिंदूराष्ट्राकडे निघाला आहे. संघ परिवार काशी मथुराचा वाद यापुढील काळात वाढवेल, असेही ओवेसी म्हणाले.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख