पुणे : एम आय एम चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाहीर उपदेश केला आहे . ओवेसी यांनी सेक्युलर या शब्दाचा अर्थ हिंदू राष्ट्र नाही असे सांगितलेले आहे.
त्याचप्रमाणे दोन वेगवेगळ्या श्रद्धांबाबत भेदभाव करायचा नाही म्हणजे सुद्धा सेक्युलॅरिझम आहे असे असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करून सेक्युलॅरिझम शब्दाचा अर्थ तर सांगितलाच शिवाय उद्धव ठाकरे यांच्यावर शेरेबाजी सुद्धा केलेली आहे !
त्यांनी असे म्हटले आहे की ,सेक्युलॅरिझम म्हणजे काय हा प्रश्न अध्यात्मिक स्वरुपाचा नाही की त्याच्यावर तुम्हाला एवढे सखोल चिंतन करण्याची आवश्यकता आहे. सेक्युलॅरिझम हा शब्द तुमच्या किमान समान कार्यक्रमामध्ये आहे. त्याचा अर्थ शोधण्यासाठी तुम्हाला एवढा वेळ लागायला नको . असो माझ्याकडून थोडे ज्ञान घ्या, असे म्हणून त्यांनी सेक्युलर म्हणजे हिंदू राष्ट्र नाही आणि दोन भिन्न श्रद्धांमध्ये मध्ये भेदभाव नाही असे सांगितले शिवाय शेवटी आता समजले का? असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर एक मंत्रीमंडळाची तातडीची बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे तेथे आलेल्या पत्रकारांशी बोलले. एका पत्रकाराने त्यांना सेक्युलर शब्दाचा अर्थ काय असा त्यांना प्रश्न विचारला होता.
तेव्हा उद्धव ठाकरे हे थोडेसे अस्वस्थ झालेले दिसत होते .तसेच किमान समान कार्यक्रमांमध्ये सेक्युलर शब्दाचा वापर करण्यात आला आहे म्हणून हा प्रश्न विचारत असल्याचे सांगितले होते . त्यावेळी ठाकरे यांनी पत्रकारांना प्रतिप्रश्न विचारला होता की तुम्ही सांगा सेक्युलरया शब्दाचा अर्थ काय ? श्री . ठाकरे त्यांनतर म्हणाले, घटनेमध्ये जे लिहिले आहे ते सर्व सेक्युलर आहे .
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.