खासदार कन्या आर्या साबळेंनी केला संगीता ठोंबरेंच्या  केजवर दावा

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे खास विश्वासू असलेले अमर साबळे हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही राज्यातून जवळीक असलेल्यांपैकी एक आहेत.
arya-sable-munde-thombre
arya-sable-munde-thombre

बीड : केज मतदार संघातून विद्यमान भाजप आमदार संगीता ठोंबरे यांच्यासह पाच जणांनी मुलाखती दिल्या आहेत. मात्र, यातील आर्या अमर साबळे यांनी इच्छुक म्हणून मुलाखत देण्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 ऐनवेळी येऊन आर्या साबळे यांनी मुळात दिली असली तरी त्यांची पर्शवभूमी पाहता हे सहज घेण्यासारखे नाही.

केज मतदार संघातून दिवंगत लोकनेत्या डॉ. विमलताई मुंदडा यांनी दोन वेळा भाजप तर तीन वेळा राष्ट्रवादीकडून विजय मिळविला. मागच्या निवडणुकीत मोदी लाट आणि दिवंगत मुंडे यांची सहानुभूती यामुळे राष्ट्रवादीला मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. येथून  भाजपच्या संगीता ठोंबरे आमदार आहेत. मात्र, त्यांचे पक्षातील इतर गटांशी राजकीय वितुष्ट आहे. 

मतदार संघात भाजपची व्होट बँक मजबूत असली तरी आमदार ठोंबरे यांची कार्यकर्त्यांची वैयक्तिक फळी फारशी मजबूत नाही. या फळीनेच त्यांचे पक्षातील इतर गटांशी कधी जुळू दिले नाही. नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी जवळीकता असल्याने ठोंबरे यांनाही पक्षांतर्गत विरोधकांशी जुळवून घ्यावे अशी गरज वाटली नसावी. 

पण, आता निवडणुकीच्या तोंडावर आमदार संगीता ठोंबरे यांच्या उमेदवारीला पक्षांतर विरोधकांनी टोकाचा विरोध सुरू केला आहे. सुरुवातीला मतदार संघात फिरणाऱ्या डॉ. अंजली घाडगे, सविता मस्के यांची नावे पुढे केली जात होती.

पण, परवा पाणी पुरवठा मंत्री आणि बीड जिल्ह्याचे विधानसभा निवडणूक निरीक्षक बबनराव पाचपुते यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आणि यात आर्या अमर साबळे यांनी केज विधानसभा मतदार संघातून इच्छुक म्हणून मुलाखत दिली आणि इथेच पाल चुकचुकली आहे. 

राज्यसभा सदस्य असलेले अमर साबळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळातले आहेत. विशेष म्हणजे राज्यातील खासदारांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट ओळख असणाऱ्यांपैकी ते आहेत. त्याहून महत्वाचे म्हणजे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे खास विश्वासू अशी त्यांची ओळख आणि मुंडेंची पहिली निवडणूक सोडता पुढच्या सर्व निवडणुकांचे व्यवस्थापन अमर साबळे यांनी पाहिलेले आहे. 

दलित - बहुजन समाजाला दिवंगत मुंडे यांच्यासाठी भाजप सोबत जोडण्याचे काम करणाऱ्या अमर साबळे यांच्याकडे निवडणुकीचे आर्थिक व्यवस्थापन असे.

आशा अनेक जमेच्या बाजू असलेल्या साबळे यांच्या कन्या आर्या साबळे यांनी ऐनवेळी येऊन उमेदवारी मागितली असली तरी त्यांच्या वरील जमेच्या बाजू पाहता त्यांची मागणी सहज घेण्याजोगी नाही हे निश्चित. मात्र, उमेदवार कोण द्यायचा ह्याचा अंतिम निर्णय मात्र पालकमंत्री पंकजा मुंडे ह्याच घेणार हेही तेवढेच खरे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com