arun jaitley is stable now | Sarkarnama

जेटली यांची प्रकृती स्थिर

सरकारनामा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

.

नवी दिल्ली :  माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती उपराष्ट्रपतींच्या कार्यालयातून शनिवारी देण्यात आली.

 उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी   रुग्णालयाला भेट देऊन जेटली यांची विचारपूस केली  . श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने आणि अस्वस्थ वाटत असल्याने अरुण जेटली यांना  शुक्रवारी   'एम्स'मध्ये दाखल करण्यात आले आहे. नायडू यांनी आज जेटली यांची भेट घेतली. जेटली उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्‍टरांनी नायडू यांना दिली. नायडू यांनी रुग्णालयात जेटली यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली, असे ट्विट उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाने केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अन्य काही मंत्र्यांनी शुक्रवारी रात्री जेटली यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती . 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख