आमदार करत असाल तर 'गोकुळ'ची जागा मोकळी करतो!

जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांना आमदारकीचे तिकीट नको पण गोकुळचे संचालकपद हवे असते. यासाठी आमदारकीपेक्षाही गोकुळचे संचालकपद मिळवण्यासाठी मोठी चुरस असते. या चुरशीमध्ये आता आमदार सतेज पाटील यांनी महाडिक यांच्या विरोधात हवा करत 'आता आमचं ठरलयं, आता गोकुळ उरलयं' असा नारा दिला आहे. यामुळे आता आगामी काळात गोकुळमध्ये काय घडते याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार करत असाल तर 'गोकुळ'ची जागा मोकळी करतो!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार करा, आम्हीही 'गोकुळ' ची जागा मोकळी करतो असा टोला ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे यांनी लगावला. या सभेत आमदारपदी निवड झाल्याबद्दल संघाचे संचालक राजेश नरसिंगराव पाटील यांचा सत्कार अध्यक्ष आपटे यांनी केला.

या प्रसंगी बोलताना श्री. आपटे यांनी ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे यांनीही विधानसभा लढवल्याचा उल्लेख केला. लगेचच डोंगळे यांनी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी माईकचा ताबा घेतला व ते म्हणाले, "आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा अशी मागणी होते, पण संघाचाही संचालक आमदार व्हावा असे मला वाटते, आम्हाला आमदार करा, आम्ही संघातील जागा मोकळी करतो' असा टोला लगावला.

श्री. डोंगळे यांनी राधानगरीतून विधानसभा लढवली होती, पण त्यात त्यांना अपयश आले. या निवडणूकीत त्यांच्या विरोधात शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे होते. आबिटकर यांना एक लाख पाच हजार 881 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे के. पी. पाटील यांना 87 हजार मते मिळाली. यात श्री. डोंगळे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com