`is article 370 imposed in baramati` | Sarkarnama

`बारामतीत कलम 370 लागू झाले आहे का`

उमेश घोंगडे 
रविवार, 15 सप्टेंबर 2019

पुणे : बारामतीत इतर पक्षांच्या नेत्यांनी सभाच घ्यायच्या नाहीत का? बारामतीत 370 कलम लागले आहे का, अशी सवालांची सरबत्ती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे प्रश्न विचारले.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही काल बारामतीत होती. त्यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला. तो आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळला. सभेला विरोध करणारे केवळ सात कार्यकर्ते होते. त्यांच्यावर लाठीमार करायची काय गरज, असा सवाल त्यांनी विचारला.

ते म्हणाले, बारामतीत मुख्यमंत्र्यांची सभाच होऊ द्यायची नाही, अशी मानसिकता कशासाठी? बारामतीत विरोधकांनी सभाच घ्यायच्या नाहीत का, तेथे 370 कलम लागले आहे. उद्या शरद पवारांच्या सभेत आमच्या कार्यकर्त्यांनी अडथळ आणला तर चालेल का. त्यामुळे लोकशाहीत प्रत्येकाला मते मांडण्याचा अधिकार आहे. तो मान्य करायला हवा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणेकरांच्या प्रति दिलगिरी व्यक्ती केली. यामागचे कारण होते ते त्यांच्या महाजनादेश यात्रेमुळे झालेल्या वाहतूक कोंडीचे! भाजप कार्यकर्त्यांना बेकायदा फ्लेक्स लावू नयेत. होर्डिंग लावल्यामुळे कोणालाही तिकिट मिळत नाही, असाही इशारा त्यांनी या निमित्ताने दिला. 

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी कोथरूड मतदारसंघात काल बेकायदा होर्डिंगमुळे रुग्णवाहिकेला रस्ता मिळू शकला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरही त्यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर बेकायदा होर्डिंग लावू नयेत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पुण्यात सरकारने 45 हजार कोटी रूपयांच्या निधीची कामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख