आंदोलने करणाऱ्या शंकरराव गडाखांवर अटक वाॅरंट

नेवासे मतदारसंघाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यावर आंदोलनाच्या कारणासाठी नेवासे न्यायालयाने वाॅरंट काढले असून, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
आंदोलने करणाऱ्या शंकरराव गडाखांवर अटक वाॅरंट

नगर : नेवासे मतदारसंघाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यावर आंदोलनाच्या कारणासाठी नेवासे न्यायालयाने वाॅरंट काढले असून, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

कर्जमाफी, कांदा अनुदान, पाटपाणी, दूध प्रश्न आदी प्रश्नांवर गडाख यांनी आंदोलने केली होती. त्याचाच एक भाग म्हणून नगर - औरंगाबाद महामार्गावरील वडाळा बहिरोबा येथे मागील वर्षी चक्काजाम आंदोलन केल्याने हे वाॅरंट काढण्यात आले आहे. शेतकरी आंदोलने केली म्हणून त्यांच्यावर विविध कलमे लावण्यात आली आहेत.

...तर शेतकरीही अटक करवून घेतील
दरम्यान, गडाख यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने केली. सरकार दुधाला भाव देत नाही. हक्काचे पाणी मराठवाड्याला देवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. गडाख यांना अटक झाल्यास नेवासे तालुक्यातील अनेक शेतकरी अटक करवून घेतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com