arogya mitra | Sarkarnama

सामान्य रुग्णाच्या मदतीसाठी आरोग्य मित्र नेमणार

महेश पांचाळ : सरकारनामा न्यूज ब्युरो 
गुरुवार, 30 मार्च 2017

मुंबई : सर्वसामान्य गरीब रुग्णाना मोफत उपचार होण्यासाठी असलेल्या सरकारी योजना आणि रुग्णालयात येणाऱ्या अडचणीच्या वेळी मार्गदर्शन करणारे आरोग्य मित्र सर्व सिव्हिल हॉस्पिटल नेमण्याचा विचार असल्याचि माहिती आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. 

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयाचि दुरावस्थेबाबत उपस्थित केलेल्या ताराकित प्रश्नांवर विधान परिषदेत सदस्यानि गरीब रुग्णाच्या सोयीसुविधेबाबत सरकारने काय उपाययोजना केल्या असे उपप्रश्न विचारले. यावर उत्तर देताना आरोग्य मंत्र्यांनी वरील उत्तर दिले. सार्वजनिक रुग्णालयाचा दर्जा सुधारणा करण्यासाठी खाजगी संस्थाचि मदत घेण्यासाठी (पीपी माडेल) केंद्र सरकारच्या धोरणानुसार पुढील कार्यवाहि केली जाईल असे सावंत यानी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख