जालना लोकसभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले जावे अशी कामगिरी व्हावी : अर्जुन खोतकर

"जालना लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांना संपूर्ण देशातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचे उद्दीष्ठ साध्य करायचे असेल तर कार्यकर्त्यांनी केवळ आपल्याला दिलेली जबाबदारीच पार पाडावी, असे आवाहन शिवसेनेचे जेष्ठ नेते राज्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.
जालना लोकसभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले जावे अशी कामगिरी व्हावी : अर्जुन खोतकर

जालना  : "जालना लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार  रावसाहेब पाटील दानवे यांना संपूर्ण देशातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचे उद्दीष्ठ साध्य करायचे  असेल तर  कार्यकर्त्यांनी केवळ आपल्याला दिलेली जबाबदारीच पार पाडावी, असे आवाहन शिवसेनेचे जेष्ठ नेते राज्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.  ते महायुतीच्या जालना शहरातील मामा चौकातील प्रचार कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.

खोतकर म्हणाले, "या निवडणुकीत आपल्या नेतृत्वाला राज्य पातळीवर काम करायची संधी उपलब्ध झालेली आहे. कार्यकर्त्यांनी निवडणुकीत शेवटपर्यंत डोळ्यात तेल घालून काम करणे आवश्यक आहे. विजय आपला आहे ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ असली तरी देशात सर्वाधिक मताधिक्य आपल्याला हवे आहे. या संकल्पासाठी आपल्याला मागे हटायचे नाही, यामुळे आपले नेतृत्व देश पातळीवर सिद्ध होणार आहे. यामुळे संपूर्ण देश वासीयांचे लक्ष जालना लोकसभेकडे वेधले जाईल.रामविलास पासवान पाच लाख मताने जेव्हा विजयी झाले तेव्हा देशभर माहीत झाले. त्याची चर्चा देशभर झाली. यंदा हे काम आपल्याला करायचे आहे."

रावसाहेब पाटील दानवे म्हणाले, "आज भाजपाचा स्थापना दिन आहे, त्यानिमित्त मी भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या दारापर्यंत आणलेल्या सर्व ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. कारण कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आपल्याला आज हे दिवस दिसत आहेत. आपली पार्टी कार्यकर्त्यांची आहे. या उलट देशातील अन्य राष्ट्रीय स्तरावरील  काँग्रेस ही एका परिवाराची पार्टी आहे. या दोघांची तुलनाच होऊच शकत नाही. दिल्लीत सन १९८० साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती. आज आपल्या पार्टीचा विस्तार देशाच्या सर्वोच्च पदापासून ग्राम पातळीवतील सदस्यापर्यंत झाला आहे."

ते पुढे म्हणाले, "आता देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. जालना लोकसभेत कार्यकर्त्यांनी मी स्वतःच उमेदवार आहे असे समजून कामाला लागावे, कारण मला राज्यभर महायुतीच्या प्रचार कार्यात सहभागी व्हायचे आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वतः आपणच उमेदवार आहोत असे समजून प्रचार कार्यात सहभागी व्हावे. नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपला सहभाग नोंदवण्याची ही संधी आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com