Arjun Khotkar Appeals People to Keep Restriant | Sarkarnama

मी म्हणणार्‍या जगातील मोठ्या देशांची अवस्था पहा -अर्जुन खोतकर (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 मार्च 2020

देश आणि राज्यावरील कोरोनाचे संकट वाढत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारकडून दिल्या गेलेल्या सूचना आणि नियमांचे पालन काटेकोरपणे करणे हे जनतेचे कर्तव्य आहे. सुदैवाने आपल्याकडे कोरोनाचे रुग्ण नाहीत. तरीही लॉकडाऊनच्या दरम्यान घरातच रहा असे आवाहन शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी केले आहे

औरंगाबाद : ''देश आणि राज्यावरील कोरोनाचे संकट वाढत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारकडून दिल्या गेलेल्या सूचना आणि नियमांचे पालन काटेकोरपणे करणे हे जनतेचे कर्तव्य आहे. सुदैवाने आपल्याकडे कोरोनाचे रुग्ण नाहीत. तरीही लॉकडाऊनच्या दरम्यान घरातच राहून आपली आणि कुटुंबाची काळजी घ्या. मी मी म्हणणार्‍या जगातील बलाढ्य देशांची अवस्था काय झाली हे बघा," असे कळकळीचे आवाहन शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

अर्जुन खोतकर म्हणाले,  पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाचा धोका वेळीच ओळखून जनतेला सतर्क केले आहे. त्यामुळेच आपल्या भागात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले नाहीत. ही समाधानाची बाब असली तरी गाफीलपणा किंवा निष्काळजीपणा आपल्याला महागात पडू शकतो. त्यामुळे राज्य, केंद्र सरकार, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सूचना याची प्रत्येकाने अंमलबजावणी करायलाच हवी,'' कितीही महत्त्वाचे काम असले तरी घराबाहेर जाणे काही दिवस तरी टाळा असे आवाहनही अर्जुन खोतकर यांनी केले आहे
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख