मुलभूत सुविधा पुरवण्याला प्राधान्य देत विकास साधला - अर्जुन खोतकर

मुलभूत सुविधा पुरवण्याला प्राधान्य देत विकास साधला - अर्जुन खोतकर

जालना : जालना विधानसभा मतदार संघात सिंचनासंबंधी मोठ्या प्रमाणावर काम झाले आहे, त्यामुळे शेती उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे खेळू लागले आहेत. येणाऱ्या काळातही शेतकऱ्यांचे अन्य प्रश्‍न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहून त्यांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहू अशी ग्वाही राज्यमंत्री तथा शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी यावेळी दिली. मतदारसंघातील रस्ते, पाणी, आरोग्य, वीज यासह मुलभूत प्रश्‍नांना प्राधान्य देत कोट्यावधींचा निधी पाच वर्षात आणत समतोल विकास साधण्याचा आपण प्रयत्न केल्याचेही खोतकर यांनी यावेळी सांगितले 

महायुतीचे अर्जून खोतकर यांचा प्रचार शिगेला पोचलेला असतांनाच पदयात्रा, कॉर्नर बैठका आणि सभामधून खोतकर पाच वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती मतदारांसमोर ठेवत आहेत. शहरात आयोजित एका बैठकीत बोलतांना त्यांनी राज्यमंत्री म्हणून मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. खोतकर म्हणाले, 
जालना मतदार संघात 2014 ते 2019 या दरम्यान सिंचनाची कामे, रस्ते, जलयुक्तशिवार अभियानची कामे मोठ्या प्रमाणात झाली. भारनियमनामुळे औद्योगिक क्षेत्रावर त्याचा विपरित परिणाम व्हायचा, त्यामुळे भारनियमन दूर करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. मतदार संघातील रस्त्यासाठी निधी मिळावा म्हणून शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून निधी मिळविला. सिंचनाची देखील मोठ्या प्रमाणावर कामे झाल्यामुळे सिंचन क्षमता तर वाढलीच शिवाय जमीनीतील पाणी पातळीही वाढली. 

मुलभूत सुविधा पुरवण्यावर भर 
मतदार संघातील दहीफळ साळेगाव, नेर धांडेगाव, जळगाव ब्राम्हणखेडा राष्ट्रीयपेयजल योजनेतंर्गत 67 कोटी रूपयांची कामे करण्यात आली आहेत. मुलभुत सुविधा योजनेतून अनेक गावात रस्ते नाली, स्मशानभुमी, समाजमंदिर आदी कामांवर पाच वर्षात 23 कोटी रुपये खर्च करण्यात आले. पाणी पुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्री जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत 20 कोटी रूपये दिल्याने पाण्याचा प्रश्‍नही सुटण्यास मदत झाल्याचे खोतकर यांनी सांगितले. 

शहरातील लोखंडी पुलाशेजारी नवीन पुल बांधकामासाठी 13 कोटी, पोखरी सिंधखेडराजा ते नाव्हा बाजीउम्रज-सावंगी रस्त्यासाठी 9 कोटी, एसआरपीएफच्या तीनशे घराच्या रूस्तीसाठी साडेसात कोटींचा निधी देऊन मुलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचा आपला प्रयत्न राहिला. शहरातील विशाल कॉर्नर ते आग्रेसन चौक दरम्यानच्या सिंमेट रस्त्यासाठी सहा कोटी, गोलापांगरी बठान ते माळीपिंपळगाव रस्त्यासाठी सहा कोटी रूपये मंजुर केल्याचे सांगत कुंडलिका नंदीवर पाच कोटी रूपयांचा पुल मंजुरीसाठी प्रयत्न केल्याची माहिती देखील खोतकर यांनी यावेळी दिली. पत्रातांडा ते सोमनाथ रस्त्याच्या पुलाच्या बांधकामासाठी चार कोटी, भाटेपुरी, हाडप, रामनगर रस्त्याच्या बांधकामासाठी तीन कोटी, जालन्यातील कन्हैय्यानगर ते मंठा चौफुली वळण रस्त्यासाठी तीन कोटी, जालना दरेंगाव, ढोकसाळ रस्त्यासाठी तीन कोटी रूपये, जालना बसस्थानक दुरूस्ती व सुशोभीकरणासाठी दोन कोटी 85 लाख रूपयांचा निधी देत मतदारसंघातील सर्वांगीण विकास साधण्याचा आपला प्रयत्न राहिल्याचे खोतकर म्हणाले, 

वीज विकासासाठी प्रयत्न 
जालना शहरात महावितरण कंपनीव्दारे 10 किलोमीटर भूमीगत वीज वाहिन्या,31 किलोमीटर एबी केबलिंग, नवीन 267 डीपी बसवल्याने वीजेचा प्रश्‍न सोडवण्यात यश आले. आयपीडीएस योजनेतंर्गत 95 किलोमीटर एबी केबल तर नवीन 40 रोहित्रे बसविण्यात आल्याने वीजेची समस्या आटोक्‍यात आली आहे. याशिवाय क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने इन्फ्रास्टक्‍टर उभारणीच्या कामासाठी 19 कोटी 66 लाख रूपयांचा निधी देण्यात आल्याचे खोतकरांनी सांगितले. रामनगर येथे 120 केव्हीची 20 केंद्राला मंजुरी, जिल्हा महिला व बालरूग्णालयातील 200 खाटांसाठी 30 कोटी रूपये , पीरपिंपळगाव आरोग्यकेंद्र नवीन इमारत बांधकामासाठी पाच कोटी रूपये, कंडवंची येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी 72 लाख रूपयांचा निधी दिल्याने याचा लाभ समाजातील सर्वच घटकांना होणार आहे. मतदार संघातील रस्ते, पुल, पाणीपुवठा, नवीन वसाहती यांना देखील भरघोस निधी देत विकासकामे केल्याचे खोतकरांनी बैठकीत सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com