तुम्ही गांधींच्या बाजूने की गोडसेंच्या ? 

तुम्ही गांधींच्या बाजूने की गोडसेंच्या ? 

पाटणा : निवडणूक रणनीतिकार आणि कधीकाळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशांतकिशोर यांनी आज जाहीर पत्रकार परिषदेत त्यांच्यावर थेट निशाणा साधला.

‘तुम्ही गांधीजींच्या बाजूने उभे आहात की गोडसेंच्या,’ असा सवाल करत त्यांनी बिहारच्या विकासाच्या मॉडेलवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. 

देशातील दहा आघाडीच्या राज्यांमध्ये बिहारला स्थान मिळावे म्हणून त्यांनी ‘बात बिहार की’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचीही घोषणा केली. 

बिहारमध्ये नवा राजकीय पर्याय तयार व्हावा, असे ज्या लोकांना वाटते त्यांच्या भेटीगाठी घेण्याचा निर्धार बोलून दाखवीत प्रशांतकिशोर यांनी २० फेब्रुवारीपासून थेट जनतेच्या दारी जाण्याची घोषणा केली.

 नितीश यांच्यासोबतच्या संबंधांवर भाष्य करताना ते म्हणाले, ‘‘नितीशजी यांनी मला मुलाप्रमाणे वागणूक दिली. माझ्या मनात त्यांच्याविषयी आदराचीच भावना आहे. त्यांच्या निर्णयांवर मला प्रश्‍नचिन्ह उपस्थित करायचे नाही.

मला पक्षात ठेवाचे की नाही, याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार त्यांच्याकडे आहेत. नितीश यांच्यासोबतचा वाद केवळ महिनाभरापूर्वीचा नाही, 

तो खूप आधीपासून सुरू झाला होता. हा संघर्ष गांधी की गोडसे, अशा स्वरूपाचा आहे. माझ्यासाठी गांधी आणि गोडसे कधीच एक असू शकत नाहीत. काळानुसार नितीशकुमार यांचे भाजपसोबतचे संबंध बदलत गेले.

बिहारला आज ठोस भूमिका घेणाऱ्या नेत्याची आवश्‍यकता आहे.’’ या वेळी प्रशांतकिशोर यांनी नागरिकत्व कायद्यावरून नितीश यांच्याशी झालेल्या मतभेदाचाही उल्लेख केला. 

विकासाच्या मॉडेलवर आक्षेप का नाही? 
अनेक बाबतींमध्ये बिहार आजदेखील पिछाडीवर आहे. बिहारची गणना २००५ पासून गरीब राज्यांमध्ये होते. आजदेखील त्यामध्ये फारशी सुधारणा झालेली नाही. हे असे असतानाही कुणीही नितीश यांच्या विकासाच्या मॉडेलला कुणीही आक्षेप घेतलेला नाही, अशी खंत प्रशांतकिशोर यांनी व्यक्त केली. 
.... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com