archana patil soon to join ncp | Sarkarnama

रासपमधून भाजपत आलेल्या अर्चना पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर

मिलिंद संगई
बुधवार, 10 जुलै 2019

बारामती शहर : धनगर आरक्षणाच्या मुद्यावरुन काहीशा नाराज असलेल्या डॉ. अर्चना पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पाटील यांनी नुकतीच बारामतीत अजित पवार यांची त्यांच्या सहयोग निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. राष्ट्रीय समाज पक्षाच्याप्रदेश सचिवपदावरुन त्यांनी गिरीश बापट यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये   धनगर मेंढपाळ यांच्या वरील होणारे हल्ले, ओबीसी व भटक्या वर्गाचे प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाल्याचे अर्चना पाटील यांनी सांगितले. मात्र प्रामुख्याने भाजपवर नाराज पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असून त्या संदर्भात ही भेट असल्याचे बोलले जात आहे. 

यावेळी अजित पवारांनी आघाडी सरकारच्या काळात अनेक प्रभावीपणे समाजातील सर्व घटकांसाठी योजना राबविल्याचे त्यांना सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी  बारामती येथे धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ या घोषणेला आता पाच वर्षे पूर्ण झाली, केंद्र व राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे मग आरक्षण का देत नाही, केवळ निवडणुका आल्या की घोषणा करायच्या  तसेच माजी मुख्यमंत्री  शरद पवारांच्या पुढाकाराने दिलेले एनटीचे आरक्षण किती फायदेशीर ठरले या सह धनगर समाजाने सामाजिक शिक्षण व व्यावसायिक पातळीवर प्रगती करावी यासाठी आघाडी सरकार आगामी काळात प्रयत्नशील असेल अशी ग्वाही पाटील यांना पवार यांनी दिली. 

धनगर समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा शब्द दिल्यामुळे भाजप सरकार सत्तेवर आले पण आरक्षणाचा प्रश्न भाजप सरकार गांभीर्याने घेत नाही. गेली पाच वर्षे समाजाला झुलवत ठेऊन  समाजाचा भ्रमनिरास केला आहे. अशा शब्दात पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी जे धोरण अवलंबिले त्यामुळे महिला व मुलींची प्रगती झाल्याचेही त्या म्हणाल्या. या भेटीदरम्यान  दौंड विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक बापुराव सोलनकर,  अविनाश भिसे,  अतुल खैरे, सूरज खोमणे उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख