archana patil joins ncp today | Sarkarnama

भारतीय जनता पक्षाच्या डॉ. अर्चना पाटील राष्ट्रवादीत

मिलिंद संगई
रविवार, 4 ऑगस्ट 2019

बारामती शहर : भाजपच्या डॉ अर्चना पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांच्या  उपस्थितीत आज येथील मेळाव्यात प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हापरिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, तालुका अध्यक्ष संभाजी होळकर ,दौंड तालुका निरीक्षक बापूराव सोलनकर , युवक प्रदेश अध्यक्ष किशोर मासाळ, बारामतीच्या नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, किरण गुजर, अविनाश भिसे, अतुल खैरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी अजित पवार म्हणाले, भाजपातून अनेक नवीन सुशिक्षित चेहरे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करीत आहेत. डॉ अर्चना पाटील यांच्यामुळे पक्षाला नवीन आणि उच्चशिक्षित चेहरा मिळाल्याने पक्षाची नवीन ओळख तयार होईल यापुढे जास्तीत जास्त नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.

डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या,``अजित पवार हे विकासाची दूरदृष्टी असणारे नेतृत्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे तरुणांची फळी उभी करून पक्ष मजबूत करू. भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भीती दाखवून पक्षात घेत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख