भाजपच्या डॉ. अर्चना पाटील यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपच्या डॉ. अर्चना पाटील यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश

बारामती शहर : भारतीय जनता पक्षाच्या इंदापूर येथील नेत्या डॉ. अर्चना पाटील यांचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज बारामती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार आहे.

डॉ. अर्चना पाटील यांनी या पूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून केले आहे. इंदापूर तालुक्यातील लासूर्णे गावचे पाटील घराण्याचा संपर्क इंदापूर तालुक्यामध्ये मोठा आहे. डॉ. अर्चना पाटील या (MBBS rediologist) आहेत. डॉ पाटील यांचे आजोबा दिनकरराव पाटील यांनी इंदापूर विधानसभेची निवडणूक शंकरराव पाटील यांच्या विरोधात लढवली होती. त्यावेळी अतिशय चुरशीची निवडणूक झाली होती. दिनकरराव पाटील यांचा अवघ्या पाचशे मतांनी पराभव झाला होता.

पक्षाला ऐक सुशिक्षित तरुण चेहरा मिळाल्याने पक्षाला निश्चित फायदा होईल असा राष्ट्रवादी ला विश्वास वाटतो आहे. राष्ट्रवादी मधून आउटगोइंग सुरू असताना अर्चना पाटील यांच्या प्रवेशामुळे पक्षाला इंदापूरपुरता दिलासा मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com