Apporva Hire Cancels Birthday Celebrations will Help Kakasaheb Shinde's Family | Sarkarnama

अपूर्व हिरेंचा वाढदिवस रद्द; काकासाहेब शिंदेंच्या कुटुंबाला सहाय्य करणार 

संपत देवगिरे 
सोमवार, 30 जुलै 2018

माजी आमदार डॉ. हिरे यांचा येत्या 1 ऑगस्टला वाढदिवस आहे. त्यानिमित्त होणाऱ्या समारंभात ते भाजपचा राजीनामा देऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते. नाशिक पश्‍चिम मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणुन त्यांची राजकीय तयारी सुरु आहे.

नाशिक : माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरु असल्याने येत्या 1 ऑगस्टला होणारा आपला वाढदिवस तसेच नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात होणारे सप्ताहाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. मराठा क्रांती मोर्चात जलसमाधी घेतलेले काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना ते सहाय्य करणार आहेत. 

माजी आमदार डॉ. हिरे यांचा येत्या 1 ऑगस्टला वाढदिवस आहे. त्यानिमित्त होणाऱ्या समारंभात ते भाजपचा राजीनामा देऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते. नाशिक पश्‍चिम मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणुन त्यांची राजकीय तयारी सुरु आहे. यानिमित्त आठवडाभर रक्तदान शिबीर, दंत चिकीत्सा शिबिर, फळे वाटप असे आठवडाभर विविध कार्यक्रम होणार होते. मात्र, सध्या मराठा आरक्षण आंदोलन सुरु आहे. त्यामुळे डॉ. हिरे यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्याऐवजी गंगापुर (औरंगाबाद) येथे गोदावरी संगमात जलसमाधी घेतलेले मराठा समाजाचे कार्यकर्ते काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना मदत करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख