अँटिकरप्शनच्या अधिकाऱ्याला धक्का मारून पोलीस लाचेच्या रकमेसह निसटला !

हिललाईन पोलिस ठाण्यातील हवालदार आसवले याने भंगारवाल्याला गाठून स्वतःसोबत अधिकाऱ्यांसाठी दरमहा 80 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
police
police

उल्हासनगर  : लाच घेतल्याप्रकरणी अटकेसाठी पुढे सरसावलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील (एसीबी) अधिकाऱ्याला पोलिसाने मोटरसायकलची हुल देत धक्‍का मारून पळ काढला. अंबरनाथ पूर्व येथे गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. 

पद्माकर आसवले असे आरोपी पोलिसाचे नाव आहे. 50 हजारांची लाच घेणे; तसेच सरकारी कामात अडथळा आणणे या आरोपांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिललाईन पोलिस ठाण्यातील हवालदार आसवले याने भंगारवाल्याला गाठून स्वतःसोबत अधिकाऱ्यांसाठी दरमहा 80 हजार रुपये लाचेची मागणी केली. ही रक्‍कम मोठी असल्याने भंगारवाल्याने लाचलुचपत विभागाचे कार्यालय गाठून उपअधीक्षक महेश पाटील यांच्याकडे तक्रार केली. पाटील यांनी आसवलेसोबतचे मोबाईलवरील संभाषण रेकॉर्ड करण्यास भंगारवाल्याला सांगितले होते. 

नंतर भंगारवाल्याने आसवलेला 80 हजारांऐवजी 50 हजार देण्याची तयारी दर्शवली. ही माहिती भंगारवाल्याने एसीबीला दिली. लाचेची रक्‍कम अंबरनाथ पूर्वेकडील एका ठिकाणी देण्याचे निश्‍चित झाल्यानंतर एसीबीने तेथे सापळा रचला होता. 

या वेळी मोटरसायकलवरून आलेल्या आसवलेने भंगारवाल्याकडून 50 हजारांची लाच घेताच एसीबीचे अधिकारी त्याच्या अटकेसाठी पुढे सरसावले; मात्र आसवलेने मोटरसायकलची हूल देत एसीबीच्या अधिकाऱ्याला धक्का मारून पलायन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com