नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा आणखी एका देवेंद्रची ! - Another Devendra has become talk of the town | Politics Marathi News - Sarkarnama

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा आणखी एका देवेंद्रची !

अतुल मेहरे 
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

देवेंद्र भुयार यांना सुद्धा भेटायला लोक मोठ्या प्रमाणत येत असून त्याच्या सोबत सेल्फी फोटो घेण्याचं मोह भेटणाऱ्यांना आवरत नाही. 

नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर पुन्हा एका देवेंद्रची क्रेझ लोकांमध्ये दिसून येत आहे. हे देवेंद्र म्हणजे मोर्शी विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडून आलेले आणि राज्याचे कृषी मंत्री अनिल बोंडे यांना पराभूत करून आलेले देवेंद्र भुयार.

 अतिशय सर्वसामान्य कुटूंबातील देवेंद्र भुयार या हिवाळी अधिवेशनात तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. राज्यातले इतर युवा आमदारांना  भेटण्यासाठी जशी कार्यकर्ते आणि लोक गर्दी करत आहेत, तसेच देवेंद्र भुयार यांना सुद्धा भेटायला लोक मोठ्या प्रमाणत येत असून त्याच्या सोबत सेल्फी फोटो घेण्याचं मोह भेटणाऱ्यांना आवरत नाही. 

लोकवर्गणीतुन निवडुन आलेले देवेंद्र भुयार आपल्या साध्या राहणीमानाने विधान भवन परिसरात चर्चेत आहेत. देवेंद्र भुयार आगामी काळात सभागृहात आक्रमकपणे शेतकऱ्यांच्या मुद्यावर नवा चेहरा म्हणून पुढे येऊ शकतात, असे बोलले जात आहे. 

छोटे मोठे आंदोलन करत, जिल्हा परिषद सदस्य पदाहुन थेट विधानसभेत  पोहचलेले देवेंद्र भुयार यांनी एक वेगळी छाप निर्माण केली असून याच कारणाने त्याची क्रेझ युवा वर्गात निर्माण झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख