राज्यातील आघाडी सरकार म्हणजे गांजराची पुंगी! अॅड. अण्णाराव पाटील यांची टीका

राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे गांजराची पुंगी असून हे सरकार चालले तर चालले नाही तर गाजराच्या पुंगीसारखे सर्वांनी मिळून खाल्ले, असे असल्याची टीका महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील यांनी केली
राज्यातील आघाडी सरकार म्हणजे गांजराची पुंगी! अॅड. अण्णाराव पाटील यांची टीका

यवतमाळ : ''राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे गांजराची पुंगी असून हे सरकार चालले तर चालले नाही तर गाजराच्या पुंगीसारखे सर्वांनी मिळून खाल्ले,'' असे असल्याची टीका महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील यांनी केली. ते येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

यवतमाळ विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी ते आले आहेत. ते अपक्ष उमेदवार संजय देरकर यांचा हेलिकॉप्टरने प्रचार करीत आहेत. अपक्ष उमेदवार दीपक निलावर, शंकर बडे व संजय देरकर यांनी एकत्रित येऊन स्थानिक महाविकास आघाडी तयार केली आहे. या आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय देरकर निवेडणूक लढत आहे. अपक्षाच्या आघाडीने निवडणुकीत चांगलाच रंग भरला आहे. अण्णा राव पाटील यांनी प्रचारासाठी त्यांना हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले असून ते सुद्धा प्रचारात सहभागी झाले आहेत. 

अपक्ष उमेदवाराची बाजू मांडण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी केंद्रातील मोदी सरकार व माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. लोकसभा निवडणुकीत मतदान यंत्रात मोठया प्रमाणात हॅकिंग करून मोदी सरकार सत्तेत आल्याचा आरोप अण्णा राव यांनी यावेळी केला. ते म्हणाले की काँग्रेस असो किंवा भाजप मतदान यंत्राच्या साहाय्याने सरकारमध्ये येत आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात येत असून मतदारांचे अवमूल्यन होत आहे. यापुढील निवडणूक बॅलेटने घ्याव्यात असा आग्रहही त्यांनी धरला. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असा वारंवार उच्चार केल्यानेच त्यांना सरकार स्थापन करता आले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com