annabhau sathe cutout issue in pandharpur | Sarkarnama

अण्णाभाऊ साठे यांच्या कटआउटची मोडतोड झाल्याने पंढरपुरात तणाव 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

पंढरपूर : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कटआउटवर दगडफेकीची घटना गुरुवारी (ता. 9) सायंकाळी येथे घडल्याने आज सकाळी त्याचे पडसाद उमटले. 

दलित कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यामुळे सकाळी शहराच्या काही भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. त्यानंतर पोलिस व दलित बांधवांनी शहरात ध्वनिक्षेपकावरून दुकाने उघडण्याचे आवाहन केल्यावर सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली आणि जनजीवन सुरळीत झाले. परंतु त्यादरम्यान दोन एसटी बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आली असून, त्यामध्ये एसटीचालक नागनाथ कांबळे हे गंभीर जखमी झाले. 

सांगोला रस्त्यावर दलित कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले आणि संबंधित समाजकंटकांना अटक करून त्यांच्या विरोधात ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. मध्यरात्री पुन्हा संतपेठेतील एक रिक्षा आणि मोटारसायकल अज्ञात लोकांनी जाळून टाकली. दरम्यान, दगडफेकप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी मध्यरात्री गुन्हा दाखल करून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख