बलात्कार करणाऱ्यांना लवकर फाशी होत नसेल तर एनकाऊंटरच योग्य : अण्णा हजारे 

हैद्राबाद येथे 27 नोव्हेंबरला एका डॉक्टर पीडितेवर चार नराधमांनी आत्याचार करून तिला जाळून टाकले, पीडितेसोबत झालेल्या या कृत्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली होती. दरम्यान, सहा डिसेंबर रोजी तपासासाठी पोलीस आरोपींना घेऊन घटनास्थळी गेले असताना आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला व पोलिसांवर हल्ला केला. अशा वेळी पोलिसांनी त्यांचा एनकाऊंटर केला, ते योग्यच केला, असे वाटते, असे अण्णा हजारेम्हणाले.
Anna Hazare Supports Hyderabad Encounters
Anna Hazare Supports Hyderabad Encounters

पारनेर (नगर) : अत्याचाराच्या घटना देशात वारंवार घडत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी जर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून देखील आरोपींना फाशीची शिक्षा होतं नसेल, तर हैद्राबाद येथील त्या चार नराधमांचा पोलिसांनी केलेला एनकाऊंटर योग्यच असल्याची प्रतिक्रिया जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.

हैद्राबाद येथे 27 नोव्हेंबरला एका डॉक्टर पीडितेवर चार नराधमांनी आत्याचार करून तिला जाळून टाकले, पीडितेसोबत झालेल्या या कृत्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली होती. दरम्यान, सहा डिसेंबर रोजी तपासासाठी पोलीस आरोपींना घेऊन घटनास्थळी गेले असताना आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला व पोलिसांवर हल्ला केला. अशा वेळी पोलिसांनी त्यांचा एनकाऊंटर केला, ते योग्यच केला, असे वाटते, असे हजारे म्हणाले.

''काही समाजसेवक, वकील, नेते मंडळी हे कायद्याच्या कक्षेत राहून या इनकाऊंटरला गुन्हा समजत असतील. मात्र  अशा लोकांना जर लवकर फाशी होतं नसेल, तर हैद्राबाद पोलिसांनी केलेलं इनकाऊंटर हे योग्यच आहे. दिल्लीमध्ये देखील काही वर्षापूर्वी अशीच एक अत्याचाराची घटना घडली होती. त्या घटनेच्या आरोपींना अटक झाली, मात्र 6 ते 7 वर्ष उलटले, तरी त्यांना फाशी झाली नाही. त्यामुळे हैद्राबाद पोलिसांनी जे केले ते योग्यच केले असे वाटते, असेच म्हणावे लागेल,'' असे हजारे यांनी सांगितले.

''हैद्राबाद सारख्या घटना देशामध्ये अनेक ठिकाणी घडत आहेत. यावर सरकारने अशा घटनेचे  फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना बनवली, ती घटना खूप चांगली आहे, मात्र अशा आरोपींवर लवकरात लवकर कारवाई होणेही तितकेच गरजेचे असते,'' असेही ते म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com