Anna Hazare Agitation in Delhi | Sarkarnama

अण्णा हजारे यांचा दिल्लीत सत्याग्रह सुरू

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली/नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन वर्षांपासून पत्रे पाठवून लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व शेतीमालाला हमी भाव मिळण्यासाठी प्रयत्न केले, पण पंतप्रधान कार्यालयाकडून विशेष कार्यवाही होत नाही, त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून दिल्लीत जंतरमंतरवर सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.

आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त दिल्लीत राजघाटावर जाऊन हजारे गांधी यांच्या प्रेरणास्थळाचे दर्शन घेतले. तेथे चिंतन करून नंतर जंतरमंतरवर सत्याग्रह सुरू केला आहे. पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनातून त्यांनी लोकपाल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, शेतीमालाला हमी भाव मिळावा, काळा पैसा आणण्याचे आश्वासन पाळले नाही अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

राळेगणसिद्धीकरांना चिंता
आज सकाळी हजारे दिल्लीला रवाना झाले. जाताना ग्रामस्थांनी अण्णांना उपोषण करू नये, तब्येतीची काळजी घ्यावी, अशी विनंती केली. तथापि, ग्रामस्थांनी माझी चिंता करू नये. मी ठणठणीत आहे, असे सांगून त्यांनी ग्रामस्थांना आपण आंदोलन करणार असल्याचे सांगितले. मागील उपोषणाच्या वेळी अण्णांची तब्येत खालावली होती. त्यामुळे यापुढे आपण उपोषण करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी वारंवार केली. मात्र, देशातील प्रश्नांसाठी आपण उपोषण, सत्याग्रह अशा स्वरुपात आंदोलने करणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख