दोन ऑक्‍टोबरपासून राळेगणसिद्धीत पुन्हा सत्याग्रह - अण्णांचा पुन्हा इशारा

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, लोकपाल व लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी व शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, या आणि इतर मागण्यांसाठी येत्या दोन ऑक्‍टोबरपासून (महात्मा गांधी जयंती) राळेगणसिद्धी येथे पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
दोन ऑक्‍टोबरपासून राळेगणसिद्धीत पुन्हा सत्याग्रह - अण्णांचा पुन्हा इशारा

राळेगणसिद्धी : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, लोकपाल व लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी व शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, या आणि इतर मागण्यांसाठी येत्या दोन ऑक्‍टोबरपासून (महात्मा गांधी जयंती) राळेगणसिद्धी येथे पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. 

हजारे यांनी आज (ता. 26) पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांना याबाबत पत्र पाठविले आहे. "आपल्या सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आपणास मी आठवण करून देत आहे. आपण निवडणूक काळात 'आम्ही सत्तेवर आलो तर देशात लोकपाल व राज्यात लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी तत्काळ करू, तसेच देशातील भ्रष्टाचार कमी करू,' असे आश्‍वासन दिले होते. मात्र, आपले सरकार स्थापन होऊन चार वर्षे झाली तरी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. देशातील भ्रष्टाचारही कमी झाला नाही, असे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव देऊ, वयोवृद्ध 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन देण्यात येईल, शेती औजारांवरील जीएसटी माफ करू, असेही आश्वासन सरकारने दिले होते. याच मागण्यांसाठी मी मार्चमध्ये रामलीला मैदानावर उपोषण केले होते. त्याही वेळी आपण या मागण्या पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन दिले आहे. मात्र, त्याबाबतही अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आल्याचे दिसत नाही.'' 

ऑक्‍टोबरपर्यंत माझ्या मागण्यांबाबत योग्य निर्णय झाला नाही, तर राळेगणसिद्धी येथे दोन ऑक्‍टोबरपासून मी पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com