शिक्षणमहर्षी अंकुशराव कदम यांचा  शरद पवार यांच्या हस्ते होणार अमृतमहोत्सवी सत्कार

मराठवाड्यामध्ये वैद्यकिय व तंत्रशिक्षणाची पायाभरणी करणारे सेवाव्रती, महात्मा गांधी मिशन या संस्थेचे सचिव व एमजीएम विद्यापीठाचे कुलपती शिक्षणमहर्षी श्री. अंकुशराव उर्फ बाबूराव कदम यांनी नुकतीच वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहे. या निमित्ताने देशाचे माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या हस्ते कदम यांचा अमृतमहोत्सवी गौरव करण्यात येणार आहे.
Ankushrao Kadam Will be Felicitated At the Hands of Sharad Pawar
Ankushrao Kadam Will be Felicitated At the Hands of Sharad Pawar

औरंगाबाद : मराठवाड्यामध्ये वैद्यकिय व तंत्रशिक्षणाची पायाभरणी करणारे सेवाव्रती, महात्मा गांधी मिशन या संस्थेचे सचिव व एमजीएम विद्यापीठाचे कुलपती शिक्षणमहर्षी श्री. अंकुशराव उर्फ बाबूराव कदम यांनी नुकतीच वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहे. या निमित्ताने देशाचे माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या हस्ते कदम यांचा अमृतमहोत्सवी गौरव करण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील राहणार आहेत. माजी मंत्री व एमजीएमचे अध्यक्ष मा. कमलकिशोर कदम यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती असणार आहे. शुक्रवार, दि. 20 डिसेंबर 2019 रोजी, सकाळी 10. 30 वा., रुक्मिणी सभागृह, औरंगाबाद येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्याच्या निमित्ताने कदम यांच्या जीवनावर आधारीत 'शिल्पकार' या गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रा. डॉ. अशोक नाईकवाडे व प्रा. डॉ. रेखा शेळके यांनी या ग्रंथाचे संपादन केलेले आहे. कदम यांच्याशी संबंधीत राज्यातील अनेक मान्यवरांचे लेख या गौरव ग्रंथामध्ये समाविष्ट असणार आहेत. 

महात्मा गांधी यांच्या विचारांचा ध्यास घेऊन मराठवाड्यातील काना-कोपर्‍यातील सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्याला उच्चशिक्षणापर्यंत पोहचविण्याचे कार्य मागील 40 वर्षांहून अधिक काळापासून मा. अंकुशराव कदम यांनी अविरत केले आहे. साधेपणा, सौदर्यदृष्टी व सर्वसामान्यांकरीता शिक्षणाची कवाडे खुली करण्याचा ध्यास या विचारांमधून कदम यांनी महात्मा गांधी मिशनच्या माध्यमातून आपला कार्य विस्तार केला. शालेय शिक्षण, उच्चशिक्षण, तंत्रशित्रण, वैद्यकिय शिक्षण, पत्रकारीता, कृषी व कृषी पुरक व्यवसाय आधारीत शिक्षण, व्यवस्थापन, ललीत कला, निसर्गोपचार, खादी प्रचार, फिल्म मेकिंग, संगणक क्षेत्र यांसह शिक्षणाच्या अनेक संधी ज्या मुंबई-पुण्यापर्यंत मर्यादित होत्या, त्या मराठवाड्यातील सामान्य विद्यार्थ्याला उपलब्ध करून देण्याचे मौलिक कार्य कदम यांनी केले आहे. 

त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्याकरीता  'शिक्षणमहर्षी मा. अंकुशराव उर्फ बाबूराव कदम अमृतमहोत्सवी गौरव समिती'ची स्थापना करण्यात आलेली आहे. या सोहळ्यांत मराठवाड्यातील अंकुशराव कदम यांच्यावर प्रेम करणार्‍या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अंकुशराव कदम गौरव समितीचे अध्यक्ष आ. विक्रम काळे, सचिव रंगनाथ काळे, उपाध्यक्ष आ. राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, खा. इम्तियाज जलील, जयप्रकाश दांडेगावकर, उत्तमसिंह पवार, सौ. फौजिया खान, अनिल पटेल, प्रा. किशोर पाटील, विजयअण्णा बोराडे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, डॉ. बाळासाहेब पवार, निमंत्रक  प्रा. प्रतापराव बोराडे, भाऊसाहेब राजळे, डॉ. पी. वाय. कुलकर्णी, तुकाराम पांचाळ, अंकुश भालेकर, अ‍ॅड. विलास डायगव्हाण, अ‍ॅड. एस. के. कदम, प्रभाकर ताठे, सुहास तेंडूलकर, समन्वयक नीलेश राऊत, सन्माननीय सदस्य पद्माकरराव मुळे, नंदकिशोर कागलीवाल, राम भोगले, मानसिंग पवार, प्रा. रा. रं. बोराडे, मधुकरअण्णा मुळे, प्रदिप साळुंके, नंदकुमार घोडेले, भाऊसाहेब पा. चिकटगावकर, कदिर मौलाना, चंद्रकांत दानवे, संजय वाघचौरे, सुधाकर सोनवणे, पंडितराव हर्षे, सुदामअप्पा साळुंके, सुरजितसिंह खुंगर, हरिश्चंद्र लघाणे, विलासचंद्र काबरा, डॉ. कल्याण काळे, गंगाधर गाडे, गोपाळराव पाटील, डॉ. दीपा क्षीरसागर, गंगाधर पटणे, कैलास पाटील,विजयकुमार साळवे, डॉ. तस्लीन पटेल, गोविंद गोंडे पाटील,शिवाजी बनकर यांनी केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com