....अखेर झेडपीच्या 'स्थायी'वर जाण्याचा अंकिता पाटील, झुरंगेंचा मार्ग मोकळा; रोहित पवारांची जागा रिक्त 

Way Clear for Ankita Patil for ZP Standing Committee
Way Clear for Ankita Patil for ZP Standing Committee

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर तु का मी, या काँग्रेसच्या दोन सदस्यांमधील अंतर्गत वादामुळे गेल्या तीन महिन्यापासून रिक्त झालेले पद भरण्याचा तिढा आता सुटणार आहे. या समितीवरील आणखी एक पद रिक्त झाल्याने या एकाच जागेसाठी हट्ट धरून बसलेल्या दोघांचाही आता या  समितीवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या दोघांनाही आता या समितीवर आपोआपच संधी मिळणार आहे. 

या एका रिक्त पदावरुन काँग्रेसचे सदस्य दत्ता झुरंगे (पुरंदर)  आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांच्यात अंतर्गत वाद निर्माण झाला होता. त्यामुळे हे पद तुला का मला या वादात रिक्त ठेवण्याची वेळ जिल्हा परिषदेवर आली होती. हर्षवर्धन पाटील यांच्या आई रत्नप्रभादेवी पाटील यांच्या आकस्मिक निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.

दरम्यान, या समितीवरील सदस्य रोहित पवार आमदार झाल्याने, त्यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व संपुष्टात आले आहे.  त्यामुळे स्थायी समितीची आणखी एक जागा रिक्त झाली आहे. सध्या दोन जागा रिक्त असल्याने आता पाटील आणि झुरंगे या दोघांनाही संधी मिळणार आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा नोव्हेंबर अखेरच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com